police  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime : लेकीच्या बचावासाठी आईनं घातली त्याच्यावर वाघिणीसारखी झडप; मुलीची छेड काढणाऱ्याला दाखवला इंगा

Mumbai Crime News : मुंबईत एका महिलेने मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्तीला चांगलीच अद्दल शिकवली आहे.शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या व्यक्तीला पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवला आहे. या घटनेनंतर धाडसी आईचं कौतुक होत आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईत शाळा सुटल्यानंतर मुलीची छेड काढणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीला एका महिलेने चांगलीच अद्दल शिकवली आहे. लेकीच्या बचावासाठी ३८ वर्षीय आईने छेड काढणाऱ्या व्यक्तीला हेरून मुसक्या आवळल्या. लेकीसाठी ढाल झालेल्या आईचं सर्वत्र कौतुक होत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शाळा सुटल्यानंतर एक व्यक्तीने गर्दीमध्ये माझी आणि माझ्या मैत्रिणीची छेड काढली, अशी तक्रार १३ वर्षीय मुलीने ७ जूनला तिच्या आईला केली. मात्र, मुलीच्या आईने एखाद्याचा चुकून हात लागला असावा, म्हणून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

काही दिवसांनी मुलीने छेड काढणाऱ्या व्यक्तीची पुन्हा आईकडे तक्रार केली. तिने माझी आणि मैत्रिणीची पुन्हा त्याच व्यक्तीने छेड काढल्याची तक्रार आईकडे केली. यानंतर मुलीच्या आईने छेड काढणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवण्याचं ठरवलं.

काही दिवसांनी मुलीची आई शाळेबाहेर येऊन थांबली. शाळा सुटल्यानंतर मुलीकडे बारिक नजर ठेवली. शाळा सुटल्यानंतर छेड काढणारा व्यक्तीही तिच्या जवळ आला. त्यानंतर मुलीने तिच्या आईला खुणावलं. त्यानंतर मुलीच्या आईने आरोपीचा पाठलाग सुरु केला. या महिलने काही अंतरापर्यंत या व्यक्तीचा पाठलाग केला. पुढे जाताना या महिलेने पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांना या व्यक्तीविषयी ओरडून सांगितलं. त्यानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३५४ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पोक्सो अंतर्गत देखील गुन्हा नोंदवला आहे. तसेच आरोपीने आतापर्यंत किती मुलींची छेड काढली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

SCROLL FOR NEXT