तमिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील थिरुमंगलम येथील शिवरकोट्टई गावात ह्रदयद्रावक घटनेत 27 वर्षीय कविता हिने आपल्या तीन वर्षांच्या मुलीला 50 फुट खोल विहिरीत फेकून दिले आणि त्यानंतर स्वतः माहेरी जाऊन गळफास घेऊन जीवन संपवले.
कविताच्या पतीचे एका महिलेसोबत अवैध संबंध होते आणि तीन महिन्यापूर्वी तिच्यासोबत तो पळून गेला. या धक्क्याने खचलेली कविता आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी राहत होती. सतत डोक्यात तोच विचार आणि मानसिकरित्या खच्चिकरण होत असल्याने कविताने आधी आपल्या पोटच्या मुलीला संपवले आणि स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली.
कविताला आणखी एक 10 वर्षांचा मुलगा आहे. यावेळी तो मित्रांसोबत दुकानात गेला होता, त्यामुळे तो या दुर्घटनेतून बचावला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह विरुधुनगर सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असून, कल्लीकुडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेजाऱ्यांनी घर बराच वेळ आतून बंद असल्याचे लक्षात आल्यावर खिडकीतून पाहिले असता, कविता छताला लटकलेली आढळली. त्यानंतर परिसरातील लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी दार तोडून आत शिरले. तीन वर्षांची संजिता बेपत्ता असल्याचे लक्षात येताच शोध सुरू झाला आणि तिचा मृतदेह जवळच्या विहिरीत सापडला. सदर घटनेमुळे परिसर हादरला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.