COUPLE ATTEMPTS SELF-IMMOLATION OUTSIDE BEED SP OFFICE OVER MISSING DAUGHTER CASE 
क्राईम

सात महिन्यापासून मुलीचा शोध लागेना! हतबल आई-वडिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

Beed Crime : एका जोडप्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल-डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सात महिन्यापासून अपहरण झालेल्या मुलीचा शोध लागत नसल्याने हतबल झालेल्या माता-पित्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

Bharat Jadhav

  • बेपत्ता मुलीच्या शोधासाठी पालकांचा आत्मदहनाचा प्रयत्न.

  • घटना बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात घडली.

  • १६ वर्षीय मुलगी सात महिन्यांपासून बेपत्ता आहे.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीडमधील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात एका जोडप्यानं अंगावर पेट्रोल-डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या या जोडप्याची सोळा वर्षांची मुलगी गेल्या सात महिन्यांपासून बेपत्ता आहे. पोलिसांकडून अद्याप तिचा शोध लागला नाहीये. इतके दिवस होऊनही मुलगी सापडत नसल्यानं हतबल झालेल्या पालकांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

बीडमधील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून एका सोळा वर्षीय मुलीचे एका तरुणाने अपहरण केले होते. या प्रकरणाला सात महिने उलटले तरी अद्यापपर्यंत या मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आपली मुलगी बेपत्ता झालेली असताना पोलीस शोध घेत नसल्याने हे आई-वडील वारंवार पोलीस अधीक्षक कार्यालयात खेटे मारत आहेत.

परंतु त्यांना नकारार्थी उत्तरे दिली जात असल्याने ते हतबल झाले होते. यातूनच बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात या मुलीच्या आई-वडिलांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दुर्घटना टळली असली तरी बीडमधून बेपत्ता झालेल्या या मुलीच्या शोध कधी लागणार हा प्रश्न मात्र कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Pregnant : ५२ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार! बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे PHOTO अन् VIDEO व्हायरल

Sugar Free Drink : शुगर फ्री ड्रिंक डायबिटीज रूग्णांसाठी हानिकारक की फायद्याचे?

Maharashtra News Live Update: बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT