Uttar Pradesh Crime News Saam Tv
क्राईम

Crime : भंयकर! आई अन् ३ मुलांचे अपहरण केलं अन् निर्घृण संपवलं, मृतदेह नदीच्या काठावर फेकले, नेमकं कारण काय?

Mother and three children kidnapped and murdered in Muzaffarpur : आई आणि तिच्या तीन निष्पाप मुलांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Namdeo Kumbhar

Bihar crime news today : आई आणि ३ मुलांचे अपहरण करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील मुझफ्फरपूरजवळच्या अहियापूरमध्ये घडली आहे. आई आणि ३ निष्पाप मुलांची हत्या केल्यानंतर मृतदेह नदीच्या काठावर बांधून टाकल्याची घटना समोर आल्यानंतर परसरात संतपाची लाट उसळली. या घटनेनंतर अहियापूरमध्ये तणाव वाढला. नागरिकांच्या संतापानंतर पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून कसून तपास केला जात आहे. हत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

बिहारमधील अहियापूरमधील चांदवाडा घाट पुलाखाली बुधी गंडक नदीच्या काठावर महिला आणि ३ मुलांचे मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. चार जणांचा मृतदेह नदीच्या काठावर बांधलेले आढळताच परिसरात संतापाची लाट पसरली. परिसरातील अनेक लोक घटनास्थळावर पोहचले. हे कृत्य कुणी केले असेल? याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.

आधी अपहरण केले अन् निर्घृण हत्या -

४ जणांचे मृतदेह नदीच्या कडेला आढळळ्याची माहिती मिळताच शहर पोलीस अधीक्षक, एसडीपीओ आणि अहियापूर पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली अन् तपास केला. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. मृत महिला ही कृष्णमोहन कुमार यांची २२ वर्षीय पत्नी ममता कुमारी असल्याचे समोर आलेय. त्याशिवाय आदित्य कुमार (६ वर्ष), अंकुश कुमार (४ वर्ष) आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी कृती कुमारी यांचेही मृतदेह आढळलेत. चौघांचे अपघरण करून खून केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

घरातून गेली ती माघारी परतलीच नाही

ममता कुमारी या बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबातील सदस्यांनी १० जानेवारी रोजी अहियापूर पोलिस ठाण्यात दिली होती. ममता कुमारी यांचे पती कृष्णमोहन कुमार हे बखरी सिपाहपूर येथील रहिवासी आहेत. ते उदरनिर्वाहासाठी दररोज ऑटो चालवतात. १० जानेवारी रोजी सकाळी कृष्णमोहन हे झिरो माइलला ऑटो चालवण्यासाठी गेले. संध्याकाळी परत आले तेव्हा त्याच्या आईने सांगितले की ममता कुमारी सकाळी ११ वाजता मार्केटिंगसाठी मुलांसह झिरो माइलला गेली होती पण परतलीच नाही.

अपहरण अन् खून

कृष्णमोहन यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत पत्नी अन् मुले बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. १२ जानेवारी रोजी ममता कुमारी आणि मुलांचे अपहरण केल्याचा फोन आला. याबाबत पोलिसांना कळवल्यास सगळ्या कुटुंबाला मारू अशी धमकी दिली होती. तक्रारीनंतरही पोलिसांनी कोणतीही ठोस पावसे उचलली नाहीत, असा आरोप कुटुंबियांनी केला.

ममता कुमारी आणि ३ मुलांचे अपहरण करून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह नदीत फेकून दिल्याचा आरोपही करण्यात आलाय. पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती तर चौघांचे जीव वाचले असते, असा संताप स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या भयंकर घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं खातं उघडलं, एकाच प्रभागातील ४ उमेदवार विजयी

Municipal Elections Result: पुण्यात मतमोजणी केंद्रावर गोंधळ, EVM मशीन बदलल्याचा ठोंबरेंचा आरोप, पोलिसांसोबत अरेरावी

Pune Mahanagar Palika Nivadnuk nikal : पुण्याचा दादा कोण? पहिला निकाल आला हाती, ३ जागांवर एकाच पार्टीचा विजय, भाजपचा पराभव

Neer Dosa Recipe : नाश्त्याला बनवा कुरकुरीत तांदूळ अन् ओले खोबरे घालून नीर डोसा, नोट करा रेसिपी

केंद्रीय मंत्र्यांचा निकटवर्तीय विजयाच्या उंबरठ्यावर, कुख्यात गुंड असलेल्या उमेदवारानं जेलमधून लढवली निवडणूक|VIDEO

SCROLL FOR NEXT