Uttar pradesh Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: बॉयफ्रेंडच निघाला हैवान! हुक्काबार ते हॉटेलपर्यंत; ७ दिवस ७ तरुणांकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार

Uttar pradesh Crime News: उत्तर प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली. तरुणीवर तिच्या बॉयफ्रेंडने आपल्या साथिदारांसोबत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यामधील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Priya More

उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. २९ मार्चला पीडित तरुणीला तिचा बॉयफ्रेंड एका हुक्का बारमध्ये घेऊन गेला होता. त्याठिकाणी पीडित तरुणीवर तिच्या बायफ्रेंडसोबत ७ जणांनी मिळून तब्बल ७ दिवस सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी काही तरुणांना पोलिसांनी अटक केली तर काही जण अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या बॉयफ्रेंडने तिला २९ मार्चला मलदहिया येथील एका हुक्का बारमध्ये नेले. त्याठिकाणी त्याचे इतर मित्र आले. त्यामधील दोन जण तरुणीच्या ओळखीचे होते. बाकीच्या तरुणांना ती ओळखत नव्हती. हुक्का बारमध्ये तरुणांनी पीडित तरुणीला गुंगीचे औषध टाकून पेय दिले. तिने ते प्यायले त्यानंतर नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ७ दिवस ७ तरुणांनी हुक्का बारपासून ते वेगवेगळ्या हॉटेलवर नेऊन पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.

लालपूर-पाण्डेयपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हुकुलगंज येथे राहणारी तरुणी २९ मार्च रोजी बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. ४ एप्रिलला पोलिसांना तरुणी सापडली. पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, इन्स्टाग्रामवर तिची साजिद नावाच्या तरुणासोबत मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या तरुणानेच तिची ओळख इतर तरुणांसोबत करून दिली. २९ मार्चला साजिदने तिला भेटायला बोलावून घेतले आणि तिच्यासोबत भयंकर कृत्य केले.

याप्रकरणी पोलिसांनी सातही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. पण पोलिसांनी यामधील काही तरुणांना अटक केली. इतर आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत. ज्या हुक्काबार आणि हॉटेलमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती त्या हॉटेल आणि हुक्काबारवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Damage Symptoms: सतत अपचन, जुलाब, पोट दुखतंय? असू शकतात लिव्हर डॅमेजची लक्षणे

Maharashtra Live News Update : : पुण्याच्या दौंड शहरात दुहेरी दरोडा; मध्यरात्री दोन ठिकाणी दरोडेखोरांचा धुमाकूळ

Viral Video News : हायवेवर स्टंट करताना भयंकर अपघात, शेवटची ३७ सेकंद काळजाचा ठोका चुकवणारी, VIDEO

Aloo Matar Recipe : हॉटेलमध्ये बनवतात तशी 'मटार बटाटा भाजी', रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटेल

Pune Gang War: आंदेकर टोळीतल्या समीर काळेचा भाऊ गणेश काळेला का संपवलं? जुनं कनेक्शन आलं समोर

SCROLL FOR NEXT