Saurabh Death Case : नवऱ्याचे तुकडे करुन ड्रममध्ये भरले, आरोपी मुस्कान जेलमध्ये काय काम करणार? बॉयफ्रेंड साहिल पिकवणार भाजीपाला

Meerut Saurabh Murder Case : तुरुंगात असलेले मुस्कान आणि साहिल अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर येत आहेत. त्यांची दिनचर्याही सुधारली आहे. दोघेही वर्तमानपत्र वाचतात आणि उर्वरित वेळ टीव्ही पाहतात.
Meerut Saurabh Kumar killed case
Meerut Saurabh Kumar killed caseSaam Tv News
Published On

मेरठ : मेरठमधील माजी नेव्ही कर्मचारी सौरभ हत्याकांडातील आरोपी साहिल आणि मुस्कान यांना काल (शनिवारी) मुलाहिजा बॅरेकमधून जनरल बॅरेकमध्ये हलवण्यात आले. ब्रह्मपुरी येथील इंदिरानगर येथील मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिलसोबत पती सौरभची हत्या केली होती. पोलिसांनी दोघांनाही अटक करून १९ मार्च रोजी न्यायालयात हजर केलं, तेथून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

पहिले १० दिवस कैद्यांना कारागृहाच्या मुळाहिजा बॅरेकमध्ये ठेवण्याची व्यवस्था आहे. साहिल आणि मुस्कान यांनाही मुळाहिजा बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते. मुस्कान १२ क्रमांकाच्या बॅरेकमध्ये तर साहिल १८ क्रमांकाच्या बॅरेकमध्ये राहिला. काल शनिवारी १० दिवस पूर्ण झाले. त्यानंतर साहिल आणि मुस्कान यांना इतर कैद्यांसह मुख्य बॅरेकमध्ये हलवले. मुस्कानने तुरुंगात शिवणकाम शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे, आता मुस्कानला शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर साहिल शुक्ला याने शेती शिकण्याची इच्छा व्यक्त केली. आता साहिल तुरुंगात भाजीपाला पिकवणार आहे.

Meerut Saurabh Kumar killed case
Maharashtra Politics : शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह, संवाद बैठकीत विसंवादाची ठिणगी; व्हॉट्सअॅप ग्रुप चॅट व्हायरल

तुरुंगात असलेले मुस्कान आणि साहिल अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर येत आहेत. त्यांची दिनचर्याही सुधारली आहे. दोघेही वर्तमानपत्र वाचतात आणि उर्वरित वेळ टीव्ही पाहतात. आता त्यांनी तुरुंग प्रशासनाला विनंती केली आहे. मुस्कानने टेलरिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर साहिलने शेतीत काम करण्याची विनंती केली आहे. दोघांनाही मुख्य बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे. त्याची दिनचर्या सुधारली आहे.

साहिल आणि मुस्कानची केस रेखा जैन लढणार आहेत. रेखा जैन यांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नियुक्ती केली होती. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मेरठचे सचिव उदयवीर सिंग म्हणाले की, प्रत्येकाला न्याय मिळवून देणे ही कायदेशीर प्राधिकरणाची जबाबदारी आहे. कलम १२ अन्वये सौरभ हत्याकांडातील आरोपी साहिल आणि मुस्कान यांना मोफत कायदेशीर मदतही देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की रेखा जैन मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण वकील आहेत. रेखा जैन यांच्यासोबत उपमुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक नासिर अहमद आणि सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक अंबर सहारन, सहायक कायदेशीर सहायक संरक्षण समुपदेशक चंद्रिका कौशिक देखील रेखा जैन यांना मदत करतील.

Meerut Saurabh Kumar killed case
Odisha Train Accident : ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात, कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डब्बे रुळावरुन घसरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com