मीरा रोड ड्रग्ज प्रकरणात हैदराबाद कनेक्शन उघडकीस आलं.
रचकोंडा चेरलापल्ली MIDC मधील ड्रग्ज फॅक्टरीवर छापा टाकण्यात आला.
पोलिसांनी ५००० कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं.
मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी हैदराबादमध्ये मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी हैदराबादमध्ये छापा मारत ड्रग्स फॅक्टरीचा भांडाफोड केलाय. त्यानंतर मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटने १४ पोलिसांसोबत घेऊन हैदराबाद येथे छापेमारी केली. मीरा रोडमधील एमडी ड्रग्सच्या एका प्रकरणात तपास सुरू असताना हैदराबाद कनेक्शन उघड झालं.
रचकोंडा येथील चेरलापल्ली एमआयडीसीमध्ये मीरा भाईंदर पोलिसांनी मोठा ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केलाय. पोलिसांनी जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची एकूण किंमत ५००० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.
हैदराबादमध्ये एमडी बनवणाऱ्या कारखान्यावर छापा मारल्यानंतर पोलिसांनी करोडो रुपायंचा मुद्देमाल जप्त केलाय. छापेमारी दरम्यान एमडी ड्रग्ससह त्यासाठी लागणारे इतर केमिकल आणि ड्रग्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य तसेच करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान याप्रकरणी एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखाना मालकास पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मिरा-भाईंदर शहरात एमडी ड्रग्स विक्री करण्यासाठी आलेल्या महिलेला गुन्हे शाखा -१ च्या पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. या महिलेकडे १०५ ग्राम एमडी ड्रग्स आढळून आले आहे. या महिलेविरोधात काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर शहरात ड्रग्स विरोधी पोलिसांकडून जोरदार कारवाया सुरू आहेत.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला काशिमिरा नाका येथे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स विक्री करण्याकरता येत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सापळा रचून फातिमा मुराद शेख या महिलेला ताब्यात घेतलं. तिच्याकडे १०५ ग्राम एमडी ड्रग्स मिळून आले. ज्याची बाजारभावाप्रमाणे २१ लाख रुपये किंमत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या महिलेकडे विचारपूस केल्यानंतर दहिसर येथील ड्रग्स माफीया कादर बादशाह याच्याकडून ड्रग्स घेतल्याचे सांगितलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.