Minor girl assault case saam tv
क्राईम

Crime news: मजुराची ११ वर्षांच्या मुलीवर वाकडी नजर; एकट्यात गाठून केलं संपातजनक कृत्य, गप्प राहण्यासाठी दिले १५० रुपये

Minor girl assault case: बेंगळुरूमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली असून POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेला वैद्यकीय मदत आणि समुपदेशन देण्यात आले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बंगळूरूमधून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. ज्ञानभारती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

बुधवारी संध्याकाळी पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी आरोपीने तिला फसवून एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेलं. त्याठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला. अत्याचारानंतर मुलीला गप्प ठेवण्यासाठी आरोपीने तिला १५० रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद मुन्ना असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. सध्या तो बेंगळुरूमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. त्यामुळे तो या शहरात राहत होता.

घटनेचा उघड कसा झाला?

आपली मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या पालकांना काळजी वाटू लागली. जेव्हा ती घरी आली तेव्हा पालकांनी तिच्या हातात पैसै पाहिले आणि चौकशी केली. पालकांनी विचारल्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला. यावेळी पालकांनी तातडीने ज्ञानभारती पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

पोलिसांनी आरोपीला केली अटक

तक्रार दाखल होताच पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केलीये. दक्षिण-पश्चिम विभागाचे डीसीपी यांनी सांगितलं की, या प्रकरणात POCSO कायद्यांतर्गत तसंच बलात्कार आणि लहान बालकांवरील अत्याचाराच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहे.

पिडीत मुलीला दिली वैद्यकीय मदत

मुलीसाठी तातडीने वैद्यकीय उपचार आणि समुपदेशनाची सोय करण्यात आलीये. पोलिसांनी आश्वासन दिलंय की, तपास पूर्ण गांभीर्याने केला जाणार आहे. त्याचप्रमाणे दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT