Crime News  Saam tv
क्राईम

Pune Crime: कॉलेजला जायला घराबाहेर पडला, परत आलाच नाही; तरुणासोबत घडलं भयंकर

Pune Crime News: जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना घडली आहे.

Dhanshri Shintre

वानवडी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या रामटेकडी परिसरात काल सकाळी सात वाजता जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना रामटेकडी येथील जामा मस्जिद समोर घडली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनिमित्त पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यश सुनिल घाटे (वय १७), अशोकभाऊ कांबळे ऑफीसच्या मागे, रामटेकडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. साहील लतीफ शेख (वय-१८) व ताहीर खलील पठाण (वय-१८, राहणार स.नं. ११० रामटेकडी) या गुन्हेगारांना अटक केली आहे. मृत यश घाटेचा भाऊ प्रज्वल सुनील घाटे याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काल सकाळी सातच्या सुमारास यश घाटे व त्याचे मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण, श्रेयस शिंदे हे रामटेकडी येथील जामा मस्जिद समोरून कॉलेजला जात असताना साहील व ताहीर यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन यश घाटे याला कोयत्याने गंभीर जखमी करुन ठार मारले. पुढील तपास वानवडी पो.स्टे.चे.पो.उ निरिक्षक मुनीर इनामदार व दिलीप पालवे हे करत आहेत.

पुण्यात अल्पवयीन आरोपींकडून गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. अल्पवयीन आरोपीने अल्पवयीन मुलाचा धार धार शस्त्राने वार करत खून केल्याची बातमी समोर आली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत नंबर वरून वाद झाले होते. पुण्यातील वडगाव बुद्रुकमधील ही धक्कादायक घटना आहे. मृत्यू झालेला मुलगा पब्जी खेळत असताना पाठीमागून येऊन धारदार शस्त्राने वार केला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करत तीन संशयित अल्पवयीन ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT