Sanjay Rathore Convoy Vehicle Accident Saam Tv News
क्राईम

Accident News : टायर अचानक फुटलं, गाडीचं नियंत्रण सुटल्यानं वाहन तीनवेळा पलटी; मंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात

Sanjay Rathore Convoy Vehicle Accident : शिवसेनेचे आमदार तथा मंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील नागपूर पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय. अकोल्यातील बोरगाव मंजूजवळ हा अपघात झाला.

Prashant Patil

अक्षय गवळी, साम टिव्ही

अकोला : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. पण राज्याच्या मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा देखील अपघात होत असल्याचं आता समोर आलं आहे. शिवसेनेचे आमदार तथा मंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील नागपूर पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय. अकोल्यातील बोरगाव मंजूजवळ हा अपघात झाला. अपघातात चार पोलीस शिपाई जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यात पोलिसांच्या वाहनाने तब्बल तीनवेळ पलटी घेतली.

जखमी पोलीस शिपायांवर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पोलिसांच्या गाडीच्या समोरील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने झाला आहे. या अपघातात वाहनाचं वरील छप्पर पूर्णपणे दबलं गेलंय. अपघातात चार पोलीस शिपाई जखमी झाले आहेत. अनिल ओंकार मडपाचे, फहीम खान असलम खान, फ्रफुल वाळके आणि अनिल मडपाचे असं जखमी झालेल्या पोलिसांची नावं आहेत. संजय राठोड जखमी पोलिसांच्या भेटीसाठी अकोला जिल्हा रुग्णालयात येणार असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, जखमींमध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर काही पोलिसांच्या पाठीवर आणि इतर ठिकाणी मुक्कामार लागलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT