Italy Crime News Saam TV
क्राईम

Italy Crime News: 5 बाळांना जन्म, 12 वेळा गर्भपात; खोटं सांगून महिलेनं सरकारी योजनेतून उकळले ९८ लाख रुपये

Ruchika Jadhav

Matenity Benefits:

आपण आई व्हावं असं प्रत्येक महीलेचं स्वप्न असतं. बाळाला जन्म दिल्यावर सरकारकडून मुलांसाठी विविध योजना राबवल्या जातात. एक बाळ आपल्या पोटात वाढवताना महिलेच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे प्रतेक देशात सरकारकडून महिलांना विविध योजनेमार्फत काही रक्कम दिली जाते. अशात गर्भवती असल्याचे नाटक करून एका महिलेने तब्बल 98 लाख रुपये सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे.

इटलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने एकूण 5 वेळा गरोदर असल्याचा बनवा केला. प्रत्येकवेळी गर्भवती राहून तिने सर्व सरकारी योजनांचा लाभ घेतला. तसेच maternity लिव्ह देखील मिळवली. पाचव्यांदा जेव्हा महिला गर्भवती होती तेव्हा तिचं हे गुपित सर्वांसमोर उघड झालं. इतकंच नाही तर या महिनेने आपण 12 वेळा गर्भपात केल्याचे देखील नाटक केले.

5 मुलांना जन्म आणि 12 वेळा गर्भपात अशी खोटी माहिती देऊन महिलेने आतापर्यंत अनेक सरकारी योजनांचा लाभ घेतला. एका हॉस्पिटलमधून तिने बनावट कागदपत्रे घेतली होती. या कागदपत्रांच्या आधारे तिने सरकारी तिजोरीच्या 110,000 यूरो म्हणजेच 98 लाख रुपये लुबाडले आहेत. आपल्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून या महिलेने सर्व प्रकारची काळजी घेतली होती.

महिला जेव्हा जेव्हा गर्भवती राहायची तेव्हा ती पोटावर एक उशी बांधत होती. तसेच गर्भवती महिला जशा चालतात आणि खण्या पिण्याची पथ्य पाळतात त्याच पद्धतीने तिनेही सर्व पथ्ये पाळली. पाचव्या मुलासाठी तिने सरकारी योजनांच्या लाभासाठी निवेदन केले तेव्हा अधिकाऱ्यांना यात काही तरी गडबड जाणवली. महिलेने खरच पाचव्या मुलाला जन्म दिलाय का हे पाहण्यासाठी अधिकारी तिच्या घरी पोहचले.

तिथे त्यांनी तिच्या पतीशी बातचीत केली. तेव्हा आम्हाला 5 मुले नाहीत असे त्याने सांगितले. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. मात्र महिला सतत आपल्या 5 मुलांचा दावा करत राहिली. मात्र तिने कोर्टात सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे महिलेला 1 वर्ष 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर महिला 50 वर्षांची आहे आणि गेल्या 12 वर्षांत तीने अशा पद्धतीने पैसे उकळले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT