Mumbai Crime News Saam TV
क्राईम

Mumbai Crime News: हुंड्यासाठी रोज व्हायचा छळ; तळहातावर कारण लिहून विवाहितेने संपवलं जीवन

Dowry Crime News: ससरच्या मंडळींकडून होत असलेल्या यात त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली आहे.

Ruchika Jadhav

Crime News:

हुंडा मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. असं असलं तरी अनेक ठिकाणी आजही हुंड्यासाठी महिलांचा छळ केला जातो. विवाहित महिलांकडून हुंडा मागितला जातो. ससरच्या मंडळींकडून होत असलेल्या याच त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केलाय. (Latest Marathi News)

मुंबईतील सातरस्ता येथे ही घटना घडलीये. संगिता कानोजिया (वय २२) असं मृत विवाहीतेचं नाव आहे. साल २०२२ मध्ये तिचे नितीशकुमार कनोजियासोबत लग्न झाले. त्यानंतर ती नालासोपारा येथे राहत होती. संगिताच्या वडिलांनी लग्नात मोठी जंगी तयारी केली होती. पाहु्ण्याचे अदारातीथ्य आणि लग्नात हुंडा देखील देण्यात आला होता.

लग्नाला काही दिवस लोटल्यानंतर सासरच्या मंडळींनी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. नवरा, सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून महिलेचा छळ होऊ लागला. तिला सातत्याने मानसिक आणि शारीरी त्रास दिला जात होता. घरी वडिलांकडून पैसे घेऊन ये असं सांगितलं जायचं.

या सर्व त्रासाला कंटाळून महिलेने राहत्या घरात गळफास घेतला आहे. यावेळी तिने आपल्या हातावरच आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं होतं. माझ्या सासरच्या व्यक्ती मला हुंड्यासाठी सातत्याने त्रास देत आहेत. त्यामुळे मी आत्महत्या करतेय असं या महिलेने हातावर लिहिलं होतं.

मुलीच्या वडिलांनी सासरच्या मंडळींविरोधत पोलीस ठाण्यात धाव घेतलीये. पोलिसांनी पती आणि सासऱ्याला ताब्यात घेतलंय. तसेच कसून चौकशी सुरू केली आहे. मुलीला न्याय मिळवून द्या अशी मागणी मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Tax : खराब रस्त्यांवर टोल वसुली नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Rain Live News : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT