Odisha King Cobra Saam TV
क्राईम

Odisha King Cobra: उलट्या काळजाचा नवरा! विषारी साप घरात सोडला; पत्नी आणि मुलीचा घेतला जीव

Man Uses King Cobra to Kill Wife: मुलगी आणि पत्नी झोपलेली असताना पतीने घरात साप सोडला आणि सर्पदंशामुळे माय लेकीचा मृत्यू झाला.

Ruchika Jadhav

Odisha Crime News:

ओडिशामधून काळीज सून्न करणारी एक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची हत्या केली आहे. नराधम पतीने यावेळी आपल्या पोटच्या लेकीचाही जीव घेतला आहे. मुलगी आणि पत्नी झोपलेली असताना त्याने घरात साप (Snake) सोडला आणि सर्पदंशामुळे माय लेकीचा मृत्यू झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओडिशातील गंजाम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. ७ ऑक्टोबर रोजी महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झालाय. दुपरी बराच वेळी महिलेने घराचे दार उघडले नाही त्यामुळे शेजारच्या व्यक्तींना काहीतरी चुकीचे घडल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.

पोलिसांना याबाबत माहितीमिळातच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात आल्यावर पोलिसांना महिला आणि तिची मुलगी या दोघींचा मृत्यू झाल्याचे समजले. पोलिसांनी दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यावर त्यात दोघींनाही सर्पदंश झाल्याची माहिती मिळाली. महिलेचा आणि मुलीचा मृत्यू साप चावल्याने झाल्याचे समजले तरी पोलिसांच्या मनात वेगळाच संशय होता.

त्यांनी या प्रकरणी गुन्हा (Crime) दाखल केला तसेच महिलेच्या पतीची चौकशी सुरू केली. सुरूवातीला पतीने आपण काहीच केलं नसल्याचा बनाव दाखवला. नंतर त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधेइबाराग गावातील रहिवासी गणेश पात्रा याचं बसंतीसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांनी एका मुलीला जन्म दिला. काही काळाने गणेश बसंतीवर संशय घेऊ लागला. संशय घेत त्याने पत्नीसोबत वाद आणि भांडणं करण्यास सुरुवात केली. पत्नीविषयी मनात जास्त राग असल्याने पतीने तिच्या हत्येचा कट रचला.

आपल्या एका मित्राकडून त्याने एक किंग कोब्रा साप विकत घेतला. विषारी किंग कोब्रा रात्रीच्यावेळी त्याने घरात सोडला. यावेळी पत्नी आणि मुलगी हॉलमध्ये झोपल्या होत्या. या दोघींनाही सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झालाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT