Illegal relationship suspicion saam tv
क्राईम

Crime News: बायकोचं मित्रासोबत अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याने रचला भयंकर कट, दोस्ताच्या छातीत गोळ्या झाडल्या अन्...

Illegal relationship suspicion: पत्नीशी अवैध संबंध असल्याच्या संशयातून मित्राची गोळी मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. आरोपीने मृतदेह विहिरीत फेकून पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तपासात संपूर्ण प्रकरण उघड केलं.

Surabhi Jayashree Jagdish

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामधील सिनौली गावात संशयाच्या जाळ्यात अडकलेल्या नात्याने एका तरुणाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. पत्नीशी अवैध संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीने त्याच्या मित्राची गोळी मारून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मृत तरुणाचं नाव मुकुल असं असून आरोपी मंजीतने पोलिसांसमोर कबुली दिली की, मुकुल वारंवार त्याच्या घरी येत असे आणि त्याच्या पत्नीशी बोलत असे. यामुळे मंजीतच्या मनात संशय निर्माण झाला होता. अनेकदा समजावून देऊनही मुकुलने येणं-जाणं थांबवलं नाही. त्यामुळे मंजीतचा राग अनावर झाला. अखेर त्याने आपल्या भाच्यासोबत मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. त्यांनी मुकुलला घरी बोलावलं आणि नंतर शेतात नेऊन त्याला दारू पाजली.

नशेत असताना छातीत गोळी

मुकुल नशेत असताना मंजीतने त्याच्या छातीत गोळी झाडली. या हल्ल्यात मुकुलचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर पुरावे लपवण्यासाठी त्यांनी मृतदेह ६० फूट खोल विहिरीत फेकून दिला आणि दोघेही त्या ठिकाणहून फरार झाले.

दोन दिवसांनी घटना उघडकीस

मुकुल १२ एप्रिल रोजी घरातून कोणालाही न सांगता बाहेर गेला होता. तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्याचा भाऊ नकुलने सांगितले की, मंजीतवर संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान मंजीत वारंवार त्याचे जबाब बदलत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी तपास वाढवताच संपूर्ण प्रकरण समोर आलं.

विहिरीतून सापडला मृतदेह

मंगळवारी राजबल यांच्या शेतात असलेल्या ६० फूट खोल विहिरीतून मुकुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मंजीतला अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंजीत याच्यावर यापूर्वीही खूनाचा गुन्हा दाखल असून २०१२ मधील एका प्रकरणात तो जामिनावर बाहेर होता. त्याला नशा करण्याची सवय असल्याचंही समोर आलंय. विशेष म्हणजे मंजीत आणि मुकुल यांच्यात पूर्वी चांगली मैत्री होती. मात्र संशयाने या नात्यात विष कालवलं आणि शेवटी त्याचं रूपांतर भीषण गुन्ह्यात झालं.

फरार भाच्याचा शोध सुरू

सध्या पोलीस मंजीतच्या फरार भाच्याचा शोध घेतायत. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर पुढील तपास अधिक वेगाने सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT