मालेगावमध्ये भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिघे जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी या तरुणावर तलवारीने सपासप वार करत त्याची हत्या केली. या घटनेमुळे मालेगावमध्ये खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणाचा तपास मालेगाव पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावमध्ये दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी तरुणाला भर रस्त्यात गाठले. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या तलवारीने या तरुणावर सपासप वार केले. या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाला तरी देखील हे तरुण थांबले नाहीत ते त्याला मारतच राहिले. मालेगाव शहरातील नानावटी पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे मालेगावचे बीड झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तोंडाला रुमाल बांधून ३ तरुण एका दुचाकीवरून येतात. झाडाच्या कडेला ते दुचाकी थांबवतात आणि रस्त्याच्या कडेला उभ्या उसलेल्या तरुणाला गाठून ते त्याच्यावर धारधार शस्त्र, तलवार आणि लाकडी दांडक्याने वार करतात त्यानंतर ते तरुणाच्या चेहऱ्यावर दगड घालून त्याची हत्या करतात. मध्यरात्री १२ च्या सुमारास हत्याकांडाची ही थरारक घटना घडली.
आठवड्यात गोळीबार, धारधार शस्त्रांनी मारहाण आणि आज पुन्हा हत्या झाल्याची घटना घडली. नितीन अर्जुन निकम असं हत्या झालेल्या तरुणाने नाव आहे. नितीन नाशिक मनपामध्ये कर्मचारी होता. आठवडाभरात अशाच प्रकारच्या ३ घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत असून यामुळे नागरिक चांगलेच घाबरले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.