Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी शिवसेना का फोडली? 3 वर्षानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली आतली बात

Eknath Shinde Shiv Sena Revolt: शिवसेनेतील नाट्यमय फुटीच्या तीन वर्षांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका धमाकेदार मुलाखतीत बंडामागील कारण उघड केले. एकनाथ शिंदेंनी पक्ष का फोडला याचे कारण काय हे जाणून घेऊ.
Eknath Shinde Shiv Sena Revolt
Devendra Fadnavis during an exclusive interview revealing inside details of Eknath Shinde’s Shiv Sena rebellion
Published On

साधरण तीन वर्षापूर्वी शिवसेनेत फुट पडली. तीन वर्षानंतरही एकनाथ शिंदेंची बंडाळी चर्चेत आहे. दरम्यान अजूनही या बंडाबाबत नवीन खुलासे समोर येत आहेत.एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत का बंड केला याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन माहिती दिलीय. हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी आतली गोष्टी सांगितलीय.

२१ जून २०२२ ला विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन विधीमंडळाच्या बाहेर पडले. त्यांनी थेट सूरत मार्गे गुवाहाटीचा रस्ता पकडला. त्यांच्यासोबत ४० आमदारांनी उठाव केला. शिवसेनेतलं हे सर्वात मोठं बंड ठरलं. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं. या बंडासाठी उद्धव ठाकरे आम्हाला दोष देऊ शकत नाही, असं म्हणत फडणवीसांनी बंडामागील वेगळेच सत्य समोर आणलंय.

आदित्य ठाकरे ठरले पक्षफुटीचे कारण?

उद्धव ठाकरे हे पक्षफुटीसाठी आम्हाला दोष देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी यंत्रणाच अशी तयार केली होती. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी उठाव केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणालेत. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कट्टर शिवसैनिक. ते पक्षातून बाहेर पडलेच नसते. पण ज्यावेळी एकनाथ शिंदेंना हे समजलं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना नेते म्हणून पुढे आणण्यासाठी आपले पंख कापत आहेत.

Eknath Shinde Shiv Sena Revolt
Mahadevi Elephant: महादेवी हत्तीणी परत येणार? खासदारानं कोल्हापूरकरांना दिली आनंदाची बातमी

सगळ्या प्रकाराच्या तडजोडी करत आहेत. एकनाथ शिंदेंकडे जे खातं होतं त्याच्या बैठकाही आदित्य ठाकरेच घेऊ लागले होते. उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्याने ते हिंदुत्वाबाबत काही बोलू शकत नव्हते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे असे पंख कापणं सुरू केलं. याशिवाय शिंदेची महत्त्वाकांक्षा होतीच. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी तो उठाव केला.

Eknath Shinde Shiv Sena Revolt
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का! मुंबईतील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंचा त्यांच्या आमदारांशी संपर्क तुटला होता, ते ते मान्यच करायला तयार नाहीत. उद्धव ठाकरेंकडे सुद्धा खोके आहेत का? मग ते कमी आहेत का, तसं काहीच नाही. उद्धव ठाकरेंनी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेला एकनाथ शिंदे आणि इतर आमदार वैतागले होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं होतं. तो अपमान झाला आणि एकनाथ शिंदेंनी तोच दिवस निवडला. कारण एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं होतं. जेव्हा एकनाथ शिंदेंच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. त्यामुळे त्यांनी उठाव केल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com