Nagpur Kalmeshwar Crime News Saam Tv
क्राईम

Nagpur : १३ वर्षांची मुलगी ६ महिन्यांची गरोदर; सख्ख्या भावानेच केला बलात्कार; न्यायालयाचा मोठा निर्णय

Nagpur Kalmeshwar Crime News : नागपुरातील १३ वर्षीय मुलीवर सख्ख्या भावाने बलात्कार केला. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २६ आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी दिली. विशेष वैद्यकीय मंडळाच्या अहवालानंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

Alisha Khedekar

  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारातून २६ आठवड्यांची गर्भधारणा

  • विशेष वैद्यकीय मंडळाचा अहवाल न्यायालयात सादर

  • न्यायालयाकडून वैद्यकीय गर्भपातास परवानगी

  • आरोपी अल्पवयीन भावावर पोस्को अंतर्गत गुन्हा

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur Kalmeshwar 13 Years Old Girl Preganant By 16 Years Old Brother नागपूरमध्ये १३ वर्षीय मुलीवर तिच्या सख्ख्या भावानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर मुलगी गर्भवती राहिली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन पीडित मुलीच्या वैद्यकीय गर्भपातासाठी परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन विशेष वैद्यकीय मंडळाने वैद्यकीय आणि मानसिक तपासणी पूर्ण करून अहवाल हायकोर्टाला सादर केला आहे.

या तपासणीमध्ये गर्भाची स्थिती, मुलीची २६ आठवड्यांच्या गर्भपातासाठी शारीरिक क्षमता तसेच संभाव्य वैद्यकीय गुंतागुंत यांचा अभ्यास करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील संबंधित १६ वर्षीय मुलाला कायद्याच्या संघर्षातील बालक म्हणून वर्गीकृत करण्यात आले असून, त्याला किशोर न्याय नियमांनुसार शासकीय निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाकडून वर्षभरात अनेकवेळा लैंगिक अत्याचार करण्यात आले. या अत्याचारातून ती २६ आठवड्यांची गर्भवती झाली. तिची तब्येत बिघडल्याने दवाखान्यात नेले असता गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीची कसून चौकशी केल्यावर सख्ख्या भावानेच अत्याचार केल्याचे सांगितले.

या पीडितेला सुरुवातीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. सध्या ती २६ आठवड्यांची गर्भवती असून तिने वैद्यकीय गर्भपातासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मागितली होती. मुलीच्या वडिलांनी तिच्यावतीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाच्या निर्देशानुसार तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले. गर्भपात शक्य आहे का? आणि असे केल्यास कोणते अडथळे निर्माण होतील, याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. मेडिकल बोर्डाचा अहवाल आल्यानंतर न्यायालयाने मुलीला गर्भपाताची परवानगी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : "हिरोच त्याच्या चित्रपटाची हिरोईन निवडतो..."; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितलं बॉलिवूडमधलं सत्य

Maharashtra Live News Update : भाजपकडून अरविंद केजरीवाल यांची बदनामी - संजय राऊत

CIDCO Lottery: नवी मुंबईत घ्या हक्काचं घर! सिडकोच्या १६,८७६ घरांची लॉटरी, पसंतीचे घर निवडीसाठी मुदतवाढ

Face Massage For Glowing Skin: गोऱ्यापान त्वचेसाठी करा फेस मसाज, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

IND vs WI: वडिलांचे अंत्यसंस्कार केले, चिता शांत होण्याआधीच देशासाठी खेळायला सज्ज, चाहत्यांचे डोळे पाणावले

SCROLL FOR NEXT