Ahilyanagar News Saam Tv
क्राईम

Ahilyanagar Attack : जामखेडच्या कला केंद्रात राडा, नर्तकीच्या तक्रारीनंतर २० जणांचा धिंगाणा, तोडफोड

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यरात्री अज्ञात १७ जणांच्या टोळक्याने तलवारी आणि काठ्यांसह तोडफोड केली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • जामखेड तालुक्यातील रेणुका कलाकेंद्रावर मध्यरात्री अज्ञात १७ जणांनी हल्ला केला

  • तलवारी आणि काठ्यांनी तोडफोड गाड्यांच्या काचा आणि किराणा दुकानाचं नुकसान केलं

  • सीसीटीव्हीत हा सगळं प्रकार कैद झाला आहे

  • पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • आरोपी बीडच्या दिशेने पळून गेल्याची माहिती समोर आली आहे

अहिल्यानगर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील जामखेड जामखेड तालुक्यातील मोहात रेणुका कला केंद्रात मध्यरात्री बाराच्या सुमारास काही टोळक्यांनी धुमाकूळ घातला. हातात धारदार शस्त्र आणि काठ्या घेऊन गाड्यांच्या काचा फोडल्या. तसेच कलाकेंद्राच्या आवारातील किराणा दुकानाचे काऊंटर फोडून कलाकेंद्रात प्रवेश केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या टोळक्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील मोहा येथे असलेल्या रेणुका कलाकेंद्रात शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास अज्ञात १७ जणांच्या जमावाने तोंडाला रूमाल लावून तलवार, काठ्या, कोयते घेऊन आले. त्यांनी कलाकेंद्राच्या आवारातील दुचाकी रिक्षांची तोडफोड केली.

तसेच गेटवर असलेल्या किराणा दुकानाचे काऊंटर फोडून कलाकेंद्रात प्रवेश करून तेथील होम थिएटर व लोकांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्यांची तोडफोड केली. सुमारे वीस मिनिटे असा प्रकार चालू होता. सदर घटनेची माहिती जामखेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

याप्रकरणी ज्योती पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात सतरा लोकांवर जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तोडफोड तीन दिवसांपूर्वी झालेल्या छेडछाड आणि मारहाण प्रकरणी दाखल गुन्ह्याचा राग मनात धरून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या तोडफोडी मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

मात्र हा सर्व प्रकार बघून कलाकेंद्रात असलेल्या महिला, लहान मुले घाबरून लपून बसले होते. पोलिसांची चाहूल लागताच धिंगाणा करणारे सर्वजण रिक्षा आणि दुचाकीवरून बीडच्या दिशेने पळून गेल्याची माहिती ज्योती पवार यांनी दिली आहे, पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रवींद्र वाघ हे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक शहरातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिस ऍक्शन मोडवर

Pune Tourism : दिवाळीत करा पुणे ट्रिप, संध्याकाळी 'या' ठिकाणी मारा निवांत फेरफटका

Ashish Shelar: मंत्री आशिष शेलारांच्या जनता दरबारात मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं, पाहा व्हिडिओ

Samruddhi Kelkar: वेस्टर्न आउटफिटमध्ये समृद्धीचा ग्लॅमरस अंदाज

Sunday Horoscope: ‘या’ राशी चारचौघात कमावणार कौतुक, तर कोणाला लाभेल प्रेमळ सहवास; जाणून घ्या रविवारचे खास राशीभविष्य

SCROLL FOR NEXT