Madhya Pradesh Crime  Saam Tv
क्राईम

Crime News: मैत्रीनं केला घात! सातवीच्या विद्यार्थिनीचं अपहरण, ३ दिवस डांबून ठेवत सामूहिक बलात्कार

Madhya Pradesh Crime: सोशल मीडियावरून मैत्री झाली. विश्वास ठेवत १०० किलोमीटर दूर भेटायला गेली. पण मैत्रीनं घात केला. पीडित मुलीला ३ दिवस डांबून ठेवत तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केला.

Priya More

सातवीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. मध्य प्रदेशच्या मांडला जिल्ह्यात ही घटना घडली. सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलीचे अपरहण करून तिला ३ दिवस डांबून ठेवत दोघांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे मध्य प्रदेश हादरले आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जबलपूरमध्ये राहणारी आहे. तिची ६ महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एका तरुणाशी ओळख झाली. मांडला येथे राहणारा राजन नावाच्या तरुणासोबत तिची मैत्री झाली. दोघांनी एकमेकांना आपले मोबाइल नंबर शेअर केले. त्यानंतर तासंतास त्यांचे फोनवर बोलणं सुरू झाले. राजनने पीडित मुलीला विश्वास घेत तिला भेटण्यासाठी मांडला येथे बोलावले. 'तुला कान्हा व्याघ्र प्रकल्प दाखवतो.', असे त्याने तिला सांगितले.

राजनवर विश्वास ठेवत पीडित मुलगी २६ एप्रिल रोजी १०० किलोमीटर दूर असलेल्या मांडाला येथे एकटी गेली. त्याठिकाणी राजन तिला भेटला. त्याने तिला कान्हा व्याघ्र प्रकल्प दाखवतो सांगून मित्राच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी राजनचा मित्र आधीच उपस्थित होता. या दोघांनी पीडित मुलीला डांबून ठेवले. सलग ३ दिवस त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. जर याची माहिती कोणाला सांगितली तर तुला जीवे मारू अशी धमकी आरोपींनी तिला दिली.

३ दिवसांनंतर आरोपींनी बुधवारी पीडित मुलीला मांडला बस स्टँडवर सोडून देत पळ काढला. तसंच तिला इशारा देखील दिला की, 'याची माहिती कोणाला सांगितली तर तुला सोडणार नाही आणि परिणाम गंभीर होतील.' घाबरलेली पीडित मुलगी कशी तरी जबलपूरमधील आपल्या घरी पोहचली आणि तिने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर धक्का बसलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना तिला घेऊन पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

Mumbai Rent Rules: मुंबईकरांच्या कामाची बातमी! घर भाड्याने देण्यापूर्वी हे काम कराच अन्यथा ₹५००० दंड भरा

Vipreet Rajyog 2025: 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीत मार्गी होणार शनी; विपरीत राजयोगामुळे मिळणार पैसाच पैसा

Local Body Election : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ? २८८ पालिका-पंचायतींसाठी स्थानिक नेतेच ठरवणार उमेदवार

SCROLL FOR NEXT