Raja Raghuwanshi Murder Case & Sonam Confession  Saam Tv News
क्राईम

Raja Raghuvanshi : राजा रघुवंशी प्रकरणात आत्तापर्यंतचा मोठा खुलासा, पतीचा मृतदेह दरीत फेकण्यात सोनमचाही हात; त्यानंतर...

Raja Raghuwanshi Murder Case & Sonam Confession : हत्येनंतर दोन मारेकरी एका स्कूटीवर आणि सोनम आणि एक मारेकरी दुसऱ्या स्कूटीवर बसले आणि सर्वजण गुन्ह्याच्या ठिकाणापासून १० किलोमीटर दूर गेले.

Prashant Patil

इंदूर : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. शिलाँगचे डीआयजी डेव्हिस एनआर मार्क यांनी पहिल्यांदाच या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचा खुलासा झाला आहे. व्हिस एनआर मार्क यांच्य मते, केवळ तीन आरोपींनी नाही तर सोनम रघुवंशीने स्वतः राजाचा मृतदेह उचलला आणि दरीत फेकून दिला. हे सर्व एका सुनियोजित कटाचा भाग म्हणून घडवण्यात आलं.

पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, गुन्ह्याच्या दिवशी तीन कॉन्ट्रॅक्ट किलर दोन स्कूटीवर आले होते. हत्येनंतर, दोन मारेकरी एका स्कूटीवर आणि सोनम आणि एक मारेकरी दुसऱ्या स्कूटीवर बसले आणि सर्वजण गुन्ह्याच्या ठिकाणापासून १० किलोमीटर दूर गेले. याचा अर्थ हत्येनंतरही, सोनम पूर्णपणे या मारेकऱ्यांसोबत होती आणि राजाचा मृतदेह लपवण्यात सहभागी होती. डीआयजी म्हणाले की, सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह याने त्यांचा गुन्हा कबूल केला आहे, परंतु जेव्हा या हत्येचा सूत्रधार कोण आहे असा प्रश्न पडला तेव्हा दोघांनीही एकमेकांवर आरोप करायला सुरुवात केली. हा आरोप-प्रत्यारोप आता पोलीस तपासासाठी एक नवीन आव्हान बनलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम आणि राजाकडे एकूण चार मोबाईल फोन होते. परंतु आतापर्यंत फक्त एकच फोन सापडला आहे. उर्वरित तीन मोबाईल फोन अजूनही बेपत्ता आहेत, जे या प्रकरणाचे गूढ उकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. डीआयजी डेव्हिस एन.आर.मार्क यांच्या कॅमेरासमोरच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं आहे. आता प्रश्न असा आहे की सोनम या हत्येची सूत्रधार होती की राज कुशवाहानेच सर्व काही आखले होते? याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई, पुणे अन् हैदराबादचा प्रवास होणार फक्त दीड तासांत; बुलेट ट्रेननं नाशिकच्या वाइन, कृषी उद्योगाला मिळेल चालना

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट

Deool Band 2 Collection : स्वामींची भक्ती अपरंपार! वीकेंडला 'देऊळ बंद 2' हाऊसफुल, बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; छप्परफाड कमाईचा आकडा किती?

PM Kisan Yojana: मे महिना संपला तरी 23 वा हप्ता नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 कधी येणार? तारीख कधी येणार समोर?

Solapur : क्रिकेटच्या मैदानात भयंकर घडलं, रोलर ओढत असताना १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT