Beed Crime : गेल्यावर्षी लग्न झालं पण...बीडमध्ये 'राजा-सोनम' प्रकरण; माहेरच्यांकडून नवऱ्याला बेदम मारहाण, हात-पाय मोडले

Beed Sonam News : रामहरी मोरे याचा विवाह मागील वर्षी अनुसया काकडे हिच्यासोबत झाला होता. परंतु घरगुती कारणावरून दोघांचं सतत भांडण होत असे. त्यामुळे हे पती-पत्नी विभक्त राहत होते.
beed crime news husband wife dispute
beed crime news husband wife disputeSaam Tv News
Published On

बीड : लग्नानंतर सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून पतीने वेगळ्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेताच संतापलेल्या पत्नीने भाऊ आणि आईला बोलावून घेत पतीचा पाठलाग करत त्याला जबर मारहाण केल्याची घटना बीडजवळ घडली. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामहरी मोरे असं मारहाण झालेल्या पतीचं नाव आहे. त्याचं लग्न गेल्यावर्षी मे महिन्यात झालं होतं. पत्नीसह तो बीडमध्ये भाडे तत्वावर राहत होता. नवरा-बयकोमध्ये वारंवार वाद होऊ लागल्याने त्याने बीडमध्येच दुसऱ्या ठिकाणी रूम करून राहण्याचा निर्णय घेतला. परंतु ही बाब खटकल्याने रामहरीच्या पत्नीने तिच्या भावाकडे म्हणजे रामगरीच्या मेव्हण्याकडे तक्रार केली. यानंतर मेव्हण्याने चारचाकी गाडीतून रामहरी याचा पाठलाग करत त्याला रस्त्यात गाठलं आणि त्याठिकाणी तिघांनी मिळून दगडाने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात रामहरीचा डावा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला. त्याच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून आता या प्रकरणात मेव्हणा, पत्नी व सासू तसेच मेहूणीच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

beed crime news husband wife dispute
Raja Raghuvanshi : मला हिंदी समजलं नाही, पण हावभाव समजले अन् केस फिरली; सोनमचं पितळ उघडं पाडणारा अल्बर्ट पीडी कोण?

नेमकं काय घडलं?

रामहरी मोरे याचा विवाह मागील वर्षी अनुसया काकडे हिच्यासोबत झाला होता. परंतु घरगुती कारणावरून दोघांचं सतत भांडण होत असे. त्यामुळे हे पती-पत्नी विभक्त राहत होते. अशातच रामहरी मोरे आपले सामान घेण्यासाठी पत्नीच्या घरी गेला असता या दोघांचे पुन्हा भांडण झालं. भांडणाचा वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच रामहरी मोरे यांनी घरातून काढता पाय घेतला आणि ते आपल्या गावी निघाले. मात्र त्याच वेळी पत्नीने तिच्या माहेरच्यांना बोलावून घेतलं. तिच्या माहेरच्या मंडळींनी रामहरी मोरेचे रस्त्यावरुन अपहरण केलं आणि त्याला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत रामहरी मोरे याचे दोन्ही पाय आणि उजवा हात मोडला. या मारहाणीत रामहरी मोरे हा जबर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.

beed crime news husband wife dispute
Pune Crime : १०० CCTV, १२०० रिक्षांची तपासणी, पुण्यातील 'त्या' मर्डर मिस्ट्रीचं कोडं सुटलं; शहरातील धक्कादायक प्रकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com