उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा वरचा भाग निखळला, जोरदार आवाजात भिंत कोसळली; छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन महिलांचा दबून मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Wall Collapses Two Women Die : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Wall Collapses Two Women Die
Chhatrapati Sambhajinagar Wall Collapses Two Women DieSam Tv News
Published On

माधव सावरगावे, साम टिव्ही

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी म्हणून काम करायच्या. तर इतर ५ जण जखमी आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्वाती खैरनाथ (वय ३५, हल्ली मुक्काम रांजणगाव मुळगाव लासलगाव) आणि रेखा गायकवाड (वय ३८, सौभाग्य चौक एन ११ हडको) असं मयत झालेल्या महिलांची नावं असल्याचं समोर आलं आहे.

आज सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान संभाजीनगर शहरात जोरदार वादळ आलं, पावसाच्या सरी कोसळल्या. सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा वरचा काही भाग निखळला आणि नागरिकांच्या अंगावर पडला. प्राथमिक माहितीनुसार ५ जण जखमी झाले आहेत. तर, एक जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रवेशद्वाराचं काही वर्षांपूर्वी नुतनीकरण झालं होतं, तो भाग कसा काय कोसळला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Wall Collapses Two Women Die
Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणी वाढल्या; इम्तियाज जलील यांचे ५ गंभीर आरोप, म्हणाले...VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com