Raja Raghuvanshi Case Saam Tv News
क्राईम

Raja Raghuvanshi Case : माझ्या भावाचा मृतदेह कुजलेला, चेहरा सांगाड्यात बदलेला, शरीरावर किडे; राजा रघुवंशीच्या भावानं सांगितली आपबिती

Raja Raghuvanshi Case : राजा रघुवंशी याचा मृतदेह सापडला तेव्हा तो पूर्णपणे कुजलेला होता. चेहरा सांगाड्यात बदलला होता आणि शरीरावर किडे पडले होते. ही माहिती राजाचा भाऊ विपिन रघुवंशी यांनी दिली आहे.

Prashant Patil

इंदूर : इंदूरमधील राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हनिमुनला गेल्यानंतर तिने आपल्या कथित प्रियकरासह पतीची हत्या केली. पत्नी सोनमने तिचा पती राजाला मारून टाकलं. या घटनेनंतर सुमारे १० दिवसांनी राजा रघुवंशी यांचा मृतदेह एका खोल दरीत आढळून आला. जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा त्यातून किडे बाहेर पडत होते. या घटनेचा लोकांवरही खूप खोलवर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घटनानंतर लग्नाबाबत एका वेगळ्याच प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. आता या विषयावर बोलताना राजा रघुवंशी यांचे भाऊ विपिन रघुवंशी यांनीही तरूण मुलांना आवाहन केलं आहे.

राजाच्या भावाची तरूण मुलांना विनंती

राजा रघुवंशी याचा मृतदेह सापडला तेव्हा तो पूर्णपणे कुजलेला होता. चेहरा सांगाड्यात बदलला होता आणि शरीरावर किडे पडले होते. ही माहिती राजाचा भाऊ विपिन रघुवंशी यांनी दिली आहे. विपिन यांनी सांगितलं की, त्यांना राजाचा मृतदेह पाहता आला नाही. जेव्हा मी मृतदेह पाहिला तेव्हा माझ्या मनात फक्त एकच गोष्ट आली की कोणीही अरेंज मॅरेज करू नये. यादरम्यान, राजाचा भाऊ विपिनने मुलांना आवाहन केलं आणि सांगितलं की काहीही झाले तरी अरेंज मॅरेज करू नका.

सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीची हत्या केली. या घटनेत सोनम रघुवंशीसह चार जणांना मेघालय पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील इतर तीन आरोपींमध्ये सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाहाचाही समावेश आहे.राज कुशवाहा व्यतिरिक्त, आणखी दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. असं म्हटलं जात आहे की सोनमने राज कुशवाहाशी लग्न करण्यासाठी राजा रघुवंशीची हत्या केली.

या घटनेनंतर सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंदनेही राजाच्या कुटुंबाला पाठिंबा दिला. गोविंद म्हणाला की जर त्याची बहीण दोषी असेल तर तिला फाशी देण्यात यावी. गोविंद म्हणाला की राजा त्याच्या भावासारखा होता. याशिवाय, गोविंद अलीकडेच राजाच्या पिंडदानाच्या वेळी राजाच्या कुटुंबासह उज्जैनला पोहोचला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

SCROLL FOR NEXT