Crime News Saam Tv
क्राईम

Madhya Pradesh Crime : १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, पुलावरून ढकललं; पीडितेची मृत्यूशी झुंज

Girl Physically Assaulted: मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून एक सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून तिला पुलाच्या खाली फेकून दिल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girl Physically Assaulted In Bhopal

एका 16 वर्षीय शाळकरी मुलीवर सोमवारी ग्वाल्हेर जिल्ह्यातील डाबरा भागात सामूहिक बलात्कार (Girl Physically Assaulted) करून पुलावरून फेकून देण्यात आल्याची घटना घडली होती. याच दिवशी एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर तिच्या पालकांना बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना देखील घडली होती. (Latest Crime News)

सोमवारी दुपारी पीडित मुलगी कोचिंग क्लासला जात होती. तेव्हा दोन तरुणांनी तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पळून नेलं. नंतर तिच्यावर शारिरीक अत्याचार केला. त्यानंतर तिला पुलावरून खाली फेकून दिलं. या घटनेतील आरोपी फरार (Madhya Pradesh Crime) आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम राबवली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीडितेला पूलावरून खाली फेकलं

मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने एका स्थानिक रहिवाशाने तिच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. तिला ग्वाल्हेर येथील रुग्णालयात दाखल केलं. पीडिता पूलावरून खाली फेकली गेल्यानंतर बचावली (girl physically assaulted thrown off bridge) आहे.

या घटनेत पीडितेला तिच्या बरगड्या आणि पायांमध्ये फ्रॅक्चर झालंय. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खोल जखमांसह तिला अनेक गंभीर दुखापती झाल्या आहेत. पण सध्या पीडित मुलीची प्रकृती आता स्थिर (Crime news) आहे.

फरार आरोपींचा शोध सुरू

पीडिता शुद्धीवर आल्यानंतर बुधवारी पोलीस पथकाने पीडितेचे जबाब नोंदवले आहेत. दोन फरार आरोपींवर गुन्हा दाखल झालाय. तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस (Girl Physically Assaulted In MP) आलीय.

या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलाय. फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT