Crime News
Crime NewsSaam Tv

Crime News: धक्कादायक! नाश्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलानं केला आईचा खून

Son Killed Mother: कर्नाटकातील मुलबागल शहरात एका अल्पवयीन मुलाने क्षुल्लक कारणावरून आईची हत्या केली आहे. एवढंच नाही तर आईच्या हत्येची कबुली या अल्पवयीन मुलाने पोलीस ठाण्यात जाऊन दिलीय. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.
Published on

Son killed mother In Mulbagal

दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतेय. लहान मुलांमध्येही गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय. कर्नाटकच्या मुलबागल (Mulbagal) शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. नाश्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाने आईची हत्या ( Son killed mother) केली आहे. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार मुलगा शाळेत जाण्याची तयारी करत होता. तेव्हा त्याने आईला नाश्ता देण्यास सांगितलं. आईने त्याला नाश्ता द्यायला नकार दिला. त्याला या गोष्टीचा प्रचंड राग आला. राग अनावर न झाल्यामुळे त्याने आईची हत्या केली. त्यानंतर पोलिसांसमोर जाऊन त्याने आत्मसमर्पण केलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोखंडी रॉडने केले वार

ही घटना शुक्रवारी कर्नाटकच्या मुलबागल शहरात शुक्रवारी घडली. अटक केल्यानंतर या अल्पवयीन मुलाने पोलीस ठाण्यात जबाब नोंदविले. त्यानुसार अल्पवयीन मुलाने आईला नाश्ता देण्यास (Karnataka Crime News) सांगितलं होतं. परंतु, आईने त्याला नाश्ता देण्यास नकार दिला. त्यामुळं तो संतप्त झाला होता.

संतापलेल्या मुलाने घरात असलेल्या लोखंडी रॉडने त्याच्या आईच्या डोक्यात वार केले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मुलाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण (Son killed mother In Mulbagal) केले.

Crime News
Gangster Sharad Mohol Killed: पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या, कोण होता शरद मोहोळ? जाणून घ्या

आरोपीनी केलं आत्मसमर्पण

पोलिसांनी सांगितले की, हा प्रकार घडल्यानंतर आरोपीनी पोलीस ठाणे गाठले. या अल्पवयीन मुलाने वरिष्ठ कर्मचारी सदस्याशी बोलण्याची विनंती केली. त्यानंतर त्याने आईची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आरोपीला अटक (Crime News) केलीय. या प्रकरणी आरोपीची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com