Bhandara Crime News : वाळू चोरीसाठी लढवली अनोखी शक्कल, एकाच नंबरच्या दाेन वाहनांवर महसूलची कारवाई

वाहतूक विभागाने देखील दोन्ही टीप्पर वर कारवाई केली. दरम्यान आणखी असे किती टिप्पर जिल्ह्यात धावत असणार याचा शाेध घेणे आवश्यक बनले आहे.
bhandara crime news
bhandara crime newssaam tv
Published On

- शुभम देशमुख

Bhandara News :

मागील अनेक वर्षांपासून भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू चोरीला उत आला आहे. वाळू चोरी करिता वापरात येणारे टिप्पर कधी बिना नंबरचे तर कधी समोर नंबर प्लेट तर कधी मागे नंबर प्लेट असलेले अनेकदा आढळून आले. परंतु तीन दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या दोन टिप्परचे नंबर हे एक सारखेच आढळून आले. याबाबत तहसील कार्यालयाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Maharashtra News)

पवनी महसूल विभागाचे कर्मचारी गस्तीवर असतांना सेलारी हनुमान मंदिर परिसरात आठ टिप्पर उभे असल्याचे गस्तीवर असलेल्या पथकांना आढळून आले. टिप्पर येथे उभे कसे, टिप्पर मध्ये गौनखनिज तर नाही ना याची चौकशी वाहन चालकाकडून करीत असताना दोन टिप्परचे नंबर हे एकसारखे आढळून आले.

bhandara crime news
Saam Impact : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर 11 गावांना जोडणारी नंदुरबारमधील बस सेवा सुरु

अधिक चौकशी केली असता त्या दोन्ही टिप्परला मागच्या बाजूने नंबर प्लेट लावलेली आढळून आली नाही तर समोरच्या बाजूने एकच नंबर आढळून आला. दोन्ही टिप्परचे नंबर प्लेट काढून बघितले असता दुसऱ्या बाजूने दोन्ही नंबर प्लेटवर दुसरा नंबर आढळून आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हे दोन्ही टिप्पर एकाच मालकाचे आहेत. पोलीस व महसूल विभागाची दिशाभूल करण्याकरिता दोन्ही टिप्परचे वेगवेगळे नंबर असतांनी सुद्धा दोन्ही टिप्पर वर एकाच नंबरची प्लेट लावण्यात आल्याने तहसीलदार यांनी कारवाई केली.

bhandara crime news
Amravati : चांदूर रेल्वे खरेदी विक्री सोसायटी निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या माजी आमदारांची सत्ता, असे आहे नवनिर्वाचित संचालक मंडळ

याची माहिती वाहतूक विभागाला दिली असून वाहतूक विभागाने देखील दोन्ही टीप्पर वर कारवाई केली. दरम्यान आणखी असे किती टिप्पर जिल्ह्यात धावत असणार याचा शाेध घेणे आवश्यक बनले आहे.

Edited By : Siddharth Latkar

bhandara crime news
Kolhapur : हातकणंगलेमधील मारामारीच्या प्रकरणावरुन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com