Palghar Crime News  Saam Tv
क्राईम

Crime News: त्र्यंबकेश्वरला फिरायला घेऊन गेला, वाटेतच तरुणाने गर्लफ्रेंडचा गळा आवळला, मृतदेह गोणीत भरून नदीत फेकला

Palghar Police: मोखाड्यातील वाघ नदीच्या पुलाखाली २५ वर्षीय तरुणीचा गोणीमध्ये मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडसह तिघांना अटक केली.

Priya More

फैय्याज शेख, भिवंडी

तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत भरून नदीमध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक - मोखाडा - जव्हार मार्गावरील वाघ नदीच्या पुलाखाली २५ वर्षीय तरूणीचा मृतदेह एका गोणीत आढळून आला होता. गुन्हेगारांनी कुठलाही ठोस पुरावा मागे सोडला नव्हता. फक गोणीवर एस. एम.28 असे ब्ल्यू रंगाच्या शाईने लिहिल्या मार्कवरून पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणाचा छडा लावला. गुजरातच्या सिल्वास येथून स्थानिक गुन्हे शाखेने मोखाडा पोलिसांच्या मदतीने हत्या करण्यात आलेल्या तरुणीच्या बॉयफ्रेंडसह दोन आरोपींना ताब्यात घेतले.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील नाशिक - मोखाडा - जव्हार मार्गावर पाच दिवसांपूर्वी एका २५ वर्षीय तरूणीची हत्या करून तिचा मृतदेह घाटकरपाड्याच्या वाघ नदीच्या पुलावरून खाली फेकून देण्यात आला होता. याबाबत मोखाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने मोखाडा पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. मृतदेह फेकलेल्या सुतळी वटाण्याच्या गोणीवर एस.एम. 28 असे ब्ल्यू रंगाच्या शाईने मार्क केले होते . या मार्कच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आणि अखेर पोलिस आरोपींपर्यंत पोहचले.

वाटणा सध्या मध्य प्रदेश, शिमला आणि हिमाचल प्रदेश येथून महाराष्ट्र येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . पोलिसांनी थेट हिमाचल प्रदेश गाठून तेथील व्यापाऱ्याकडे माहिती घेतली असता हा माल वापी येथील होलसेल व्यापाऱ्याकडे पाठविल्याची माहिती मिळाली. मात्र हाती पुरावा नसल्याने तपास थांबवण्याच्या तयारीत असताना तलासरी येथील सहाय्यक पोलिस सुनील माळी यांनी मृत तरूणीला गुन्हा घडण्याच्या तीन दिवस आगोदर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर परिसरात बघितले होते असे सांगितले. तेव्हा पोलिसांनी तपासाची सर्व चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान हत्या करण्यात आलेली तरुणी नेपाळची रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. काजोल गुप्ता असं मृत तरुणीचे नाव असून तिचे राजकुमार राजबिहारी या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आरोपी राजकुमारच्या घरातून काजोलला विरोध होता. त्यामुळे आरोपींनी तिचा काटा काढण्याचे ठरवले. सिल्वास येथे राहणारा आरोपी सुरेश सिंग याची कार भाड्याने घेतली. राजकुमार आणि अन्य आरोपी हे सिल्वासहून डाहाणू महालक्ष्मी मंदिर येथे आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे फिरायला गेले. १ एप्रिलच्या रात्री मोखाडा तालुक्यातील जंगलात या आरोपींनी काजोलची स्कार्फने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर कारमध्ये असलेल्या गोणीत काजोलचा मृतदेह भरून तो वाघ नदीच्या पुलाखाली फेकून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT