Palghar-Nashik Highway : प्रवास होणार झटपट, नाशिक ते पालघर फक्त एका तासात; कसा आहे १८०२० कोटींचा गेमचेंजर प्रकल्प?

Palghar-Nashik Highway project : नाशिक ते पालघर प्रवास आता एका तासात होणार आहे. नव्या प्रकल्पामुळे हा प्रवास झटपट होणार आहे. जाणून घ्या १८०२० कोटींचा हा प्रकल्प.
palghar News
palghar Saam tv
Published On

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-दिल्ली महामार्ग महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्वाचे प्रकल्प मानले जातात. या दोन्ही प्रकल्पांचे मोठ्या वेगाने कामे सुरु आहेत. या दोन्ही प्रकल्पांचे काम सुरु असताना राज्यात १८०२० कोटींचा नाशिक ते पालघर महामार्ग उभारला जात आहे. या मेगा प्रोजेक्टमुळे नाशिक ते पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा ४ तासांचा प्रवास आता अवघ्या एका तासात होणार आहे.

palghar News
MPMC Project Investment : पोलिस कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार पुर्ण, MPMC प्रकल्पामध्ये 600 कोटींची परदेशी गुंतवणूक

वाढवण बंदर आणि नाशिक जिल्ह्याचं अंतर कमी करण्यासाठी द्रुतगती महामार्ग बांधला जात असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा ११८ किमी लांबीचा महामार्ग बांधला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. हाच महामार्ग पुढे मुंबई-सुरत समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. यानंतर चारोटी-इगतपुरीदरम्यान एकूण ८५.३८ किमी लांबी मार्गापर्यंत पुढे जाणार आहे.

palghar News
Refinary Project: आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या वाटेवर,गुजरात आणि आंध्र प्रदेशसोबत चर्चा सुरू

मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा महामार्ग आहे. हा एकूण ७०० किलोमीटरपेक्षा मोठा आहे. हा महामार्ग मुंबई ते नागपूरला जोडला जातो. समृद्धी महामार्ग हा राज्यातील १० जिल्ह्यांना जोडला जातो. तसेच ३९० गावातून हा महामार्ग जातो. दुसरीकडे दिल्ली-मुंबई महामार्गामुळे २४ तासांचा प्रवास १२ तासांत पूर्ण होणार आहे. हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे ८ पदरी असल्याची माहिती मिळत आहे .

दिल्ली-मुंबई महामार्गावरच मुंबई-वडोदरा-जेएनपीटी बंदराला जोडणारा देखील मार्ग आहे. वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे आणि दुसऱ्या बाजूने सध्याच्या नाशिक महामार्गासाठी एकूण ६ किमी लांबीचा जोडरस्ता बांधला जातोय. समृद्धी महामार्ग संपल्यावर जोड रस्त्यावरून वसई,विरार,डहाणू, सूरतमार्ग वडोदरा आणि तिथून हा मार्ग मुंबई-दिल्ली महामार्गाला जोडला जाणार आहे. दोन्ही महामार्ग वाढवण बंदराला जोडला जाणार आहेत.

palghar News
Mumbai Coastal Road Project : कोस्टल रोडचं लोकार्पण, आता मरिन ड्राईव्ह ते वांद्रे फक्त १५ मिनिटांवर,VIDEO

नाशिकला पालघर वाढवण बंदराशी जोडण्यासाठी नवा महामार्ग बांधला जात आहे. पालघर आणि नाशिकमधील एकूण ४२ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. पालघरमधील जव्हार आणि मोखाडा तसेच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीतून प्रस्तावित महामार्ग जाणार आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील औद्योगिक, आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच रोजगाराच्याही सधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्रालाही फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी १८०२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com