Crime News: मेरठनंतर बिजनोर हादरले! मखाण्यात झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या, गुंगी येताच बायकोने नवऱ्याचा गळा घोटला

Meerut Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेने आपल्या नवऱ्याची हत्या केली. आधी नवऱ्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिक्स करून दिल्या. त्यानंतर तिने नवऱ्याचा गळा घोटला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.
Crime News: मेरठनंतर बिजनोर हादरले! मखाण्यात झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या, गुंगी येताच बायकोने नवऱ्याचा गळा घोटला
Meerut Crime NewsSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मुस्कानने पतीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बिजनौरमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली. याठिकाणी बायकोने नवऱ्याची गळा दाबून हत्या केली. रेल्वे कर्मचारी असलेल्या दीपकच्या बायकोने त्याच्या त्रासाला कंटाळून संतप्त होत हत्या केली. या घटनेमुळे बिजनौरमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय दीपक कुमार रेल्वे कर्मचारी म्हणून काम करत होते. दीपक त्यांची बायको शिवानीवर खूप संशय घ्यायचे. याच कारणामुळे त्यांची इच्छा होती की बायकोने आणि मुलांनी गावामध्ये आई-वडिलांजवळ राहावे. पण दीपकच्या बायकोला शहरामध्ये राहायचे होते आणि याच कारणावरून दोघांमध्ये प्रचंड वाद होत होता.

Crime News: मेरठनंतर बिजनोर हादरले! मखाण्यात झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या, गुंगी येताच बायकोने नवऱ्याचा गळा घोटला
Pune Crime : पुणे विमानतळावर पोलिसांची चिंधीचोरी; विक्रेत्याचे ५६ बेडशीट पळवले, परत देण्यासाठी दोघांनी...

आपली मुलं आणि नवऱ्यासोबत शहरामध्ये राहण्याची शिवानीची इच्छा होती. ती वारंवार दीपक यांच्याकडे याबाबत हट्ट करायची. अशात दीपक तिच्यावर वारंवर संशय घ्यायचे. तिचे बाहेर कोणासोबत तरी अफेअर सुरू असल्याचे त्यांना वाटायचे. याच कारणावरून दीपक यांनी शिवानीला मारहाण केली होती. याचाच राग मनात ठेवून शिवानीने दीपक यांचा हत्या करण्याचा प्लान आखला.

पोलिसांनी सांगितले की, १५ दिवसांपूर्वी नजीदाबादमध्ये कुटुंबासोबत राहायला आलेल्या शिवानीने दीपक यांची हत्या केली. दीपक यांना तिने मखाने खायला दिले. या मखान्यामध्ये तिने झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या होत्या. जेव्हा दीपक यांना गुंगी आली तेव्हा शिवानीने गळा दाबून त्यांची हत्या केली. शिवानीचा उजवा हात आधीपासूनच फॅक्चर होता. अशामध्ये तिने दीपक यांची गळा दाबून हत्या करण्यासाठी डावा हात वापरला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली.

Crime News: मेरठनंतर बिजनोर हादरले! मखाण्यात झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या, गुंगी येताच बायकोने नवऱ्याचा गळा घोटला
Pune Crime : १५ लाख द्या अन् ॲडमिशन घ्या; पुण्यातील नामांकित कॉलेजच्या नावाने फसवणूक, युट्युबला जाहिरात टाकून दिशाभूल

सध्या शिवानीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून क्राइम सीन देखील रिक्रिएट केला होता. पोलिसांच्या हाती एक व्हिडिओ देखील लागला आहे ज्यामध्ये शिवानी आणि तिचा नवरा दीपक भांडण करताना दिसत आहेत. तेव्हा त्यांचा मुलगा वेदांत रडत असल्याचा आवाज येत आहे. नवऱ्याची हत्या केल्यानंतर शिवानीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आधी हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पण पोस्टमॉर्टममध्ये दीपकचा मृत्यू गळा आवळून हत्या केल्यामुळे झाल्याचे समोर आले.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये रेल्वे कर्मचारी दीपक यांनी शिवानीसोबत लव्ह मॅरेज केले होते. सासरच्या मंडळींसोबत झालेल्या वादानंतर शिवानीने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती दीपक यांच्या मागे लागली आणि शेवटी दीपक आणि शिवानी भाड्याच्या घरात राहू लागले. याठिकाणीच शुक्रवारी दुपारी शिवानीने दीपकची हत्या केली.

Crime News: मेरठनंतर बिजनोर हादरले! मखाण्यात झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या, गुंगी येताच बायकोने नवऱ्याचा गळा घोटला
Dombivli Crime : 'Excuse me' बोलण्याचा संताप, मराठी बोला सांगत तरुणीला बेदम मारहाण; डोंबिवलीतला थरारक VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com