Solapur Crime: Saam Tv
क्राईम

Solapur Crime: भेटायला बोलावून तरुणाने गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर स्वत:वरही केले वार; हत्याकांडाच्या घटनेने सोलापूर हादरले

Solapur Police: सोलापुरमध्ये एका तरुणाने गर्लफ्रेंडची हत्या करत नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सोलापुरमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

Summary:

  • प्रेमसंबंधातून सोलापुरात भयंकर हत्याकांडाची घटना घडली

  • तरुणाने गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केली

  • गर्लफ्रेंडला संपवल्यानंतर तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला

  • अक्कलकोटमध्ये ही धक्कादायक घटना घडली

सोलापुरमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. तरुणाने गर्लफ्रेंडची धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वर देखील वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रेमसंबंधातून ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या हत्याकांडाच्या घटनेमुळे सोलापूर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या अक्कलकोट नगरीत प्रेमसंबंधातून ही घटना घडली. तरुणाने गर्लफ्रेंडवर हल्ला करत तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. अक्कलकोट येथील हद्दवाड भागात ही घटना घडली. याठिकाणी एका घरात एका दिवसासाठी भाड्याने रूम घेऊन दोघे जण राहिले होते. याच ठिकाणी तरुणाने गर्लफ्रेंडवर धारदार शस्त्राने वार करत तिला संपवले. त्यानंतर त्याने स्वत:वर देखील वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

स्नेहा बनसोडे (२० वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणीचे नाव होते. तर आदित्य रमेश चव्हाण ( २२ वर्षे) असं आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपी अक्कलकोट येथे राहतो. ४ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला. या घटनेत जखमी झालेल्या आदित्यवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात आदित्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, स्नेहा बनसोडे ही मागासवर्गीय जातीची होती. आरोपी आदित्यला हे माहिती होते. तरी त्याचे स्नेहासोबत प्रेमसंबंध होते. यातूनच त्याने तिची हत्या केली. त्याने स्नेहाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत हत्या केली. त्यानंतर स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. स्नेहाची आई शाळेत शिपाई म्हणून काम करते तर तिच्या वडिलांचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stop eating sugar: 21 दिवस साखर खाणं सोडलं तर शरीरात होतील हे बदल

Maharashtra Live News Update: बदलापूर MIDC पॅसिफिक केमिकल कंपनीत लागोपाठ 8 ते 10 स्फोट

Ladki Bahin Yojana : 3 हजारांच्या ऐवजी १५०० रुपये मिळाले, आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर

Honeymoon Destination : 'सुहाना सफर और ये मौसम...', 'हे' आहे भारतातील सर्वात सुंदर हनिमून स्पॉट

Nitesh Rane: निलेश-नितेशमध्ये शीतयुद्ध? राणे कुटुंबात अंतर्गत वाद की 'ऑल इज वेल'?नितेश राणेंचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT