I Love You Saam
क्राईम

ती सारखं I Love You म्हणायची, संतापलेल्या विवाहित तरूणाने मुलीचा गळा चिरला अन्...

Ex girlfriend murder case : माजी प्रियकरावर हत्येचा आरोप असून पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली. प्रेमप्रकरणातून झालेल्या वादानंतर ही घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे.

Namdeo Kumbhar

ex girlfriend murder case details : लग्नानंतरही गर्लफ्रेंडने पाठ सोडली नाही. त्याच्या मागे सारखा तगदा लावला होता. सारखं आय लव्ह यू म्हणायची. संतापलेल्या तरूणाने मुलीचा गळा चिरून खून केला. हे धक्कादायक प्रकरण छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात घडले. एक्स गर्लफ्रेंडने लग्नानंतरही त्याचा पाठलाग सोडला नाही. सारखं I Love You म्हणायची. त्यामुळे संतापलेल्या विवाहित तरूणाने गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी फक्त चार तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी हा ट्रेलर चालक असल्याचे समोर आलेय.

घरात रक्ताने माखलेला मृतदेह आढळला

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. कोरबामधील नागिनझोरखी येथील २५ वर्षीय नम्रता साहू (रानू) हिचा रक्ताने माखलेला मृतदेह तिच्याच घरात आढळला. मृत महिलेचे आई-वडील घरी परतल्यानंतर त्यांना या धक्कादायक घटनेची माहिती मिळाली. सीएसपी विमल पाठक आणि पोलिस स्टेशनचे प्रभारी प्रेमचंद साहू घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. नम्रताच्या डोक्यावर आणि मानेवर खोलवर जखमा होत्या. त्यावरून तिची निर्घृण हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.

लग्नानंतरही त्याच्या प्रेमातच अडकली, अन्..

बंधाखर गावातील २५ वर्षाचा राहुल जोगी याचे लग्नाआधी नम्रतासोबत प्रेमसंबंध होते. राहुल याने दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले. पण लग्नानंतरही नम्रता हिने राहुलचा पाठलाग सोडला नाही. राहुल पत्नीसोबत सिरकीमध्ये भाड्याच धरात राहत होता. राहुलला नम्रातासोबतचे हे नाते संपवायचे होते. पण नम्रता त्याला फोन करून प्रेमसंबंध सुरू ठेवण्यासाठी दबाव आणत होती. सारखं आय लव्ह यू.. माझं तुझ्यावर खूप प्रेम असल्याचे सांगत होती.

वादानंतर गळा चिरला -

नम्रताने १६ जानेवारीला राहुलला फोन करून घरी बोलावले. राहुल आणि नम्रता यांच्यामध्ये दीर्घ चर्चा झाली. मला तू फोन करू नकोस, असे राहुलने नम्रताला वारंवार सांगितले. पण ती ऐकायला तयार नव्हती. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की राहुलच्या डोक्यात सनक केली. त्याने घरातील चॉपरने नम्रतावर हल्ला केला. राहुलने नम्रताच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की नम्रताचे डोके चिरडले गेले आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kokan Tourism: कोकणात बीच फिरून कंटाळलात? मग या ५ ऐतिहासिक किल्ल्यांना नक्की भेट द्या

Wight Loss Food: वजन कमी करायचं आहे? मग, जाणून घ्या कोणत्या पदार्थामध्ये सर्वात जास्त फायबर असतात

Sayali Sanjeev: तुला पाहून मन वेडं झालं...

मोठी बातमी! नंदूरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदाराला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याना सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला- शिवाजी सावंत

SCROLL FOR NEXT