crime news google
क्राईम

Crime News : निवडणुकीत धडक कारवाई, नागपूरमध्ये 37 लाखांची दारू, तर वाशिममध्ये २ लाखांचा गुटखा जप्त

Liquar And Gutkha Seized: राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागपूरमधील धरमपेठ परिसरात महागड्या विदेशी स्कॉच मद्याचा साठ्यासाह एकूण ३७ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तर वाशिममध्ये २ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र विधानसभा याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागपूरमधील धरमपेठ परिसरात महागड्या विदेशी स्कॉच मद्याचा साठ्यासाह एकूण ३७ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धरमपेठ मुलींच्या शाळेजवळील परिसरात ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला मद्याचा हा साठा हरियाणा राज्यातील आहे. एका वाहनामधून मद्याचा साठा उतरविला जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. वाहनासह जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ३७ लाख ७१ हजार २०० एवढी आहे. याप्रकरणी वाहनाचा मालक निलय गडेकर याला अटक करण्यात आली आहे.

तसेच आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच अमित किशोर बोबडे या इमास फरार घोषित करण्यात आले आहे आणि याप्रकरणी गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक उमेश शिरनाते करीत असून फिर्यादी प्रशांत धावले आहेत. गाडीची झडती घेतली असता त्यात विदेशी मद्यसाठ्यात रेडलॅबल, ब्लॅकलॅबल, जेबसन असे ७१ सिलबंद बॉटल्स जमा करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, वाशिम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नवदिप अग्रवाल यांचे पथकाने अवैध धंद्यांविरूद्ध कारवाईची धडक मोहिम सुरू केली आहे. रिसोड येथील तापडिया यांचे घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये गुटख्यासह एकूण आठ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

वाशिम येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अग्रवाल यांना मिळालेल्या माहितीनुसार बालाजी गल्ली रिसोड येथे सागर सुनिल तापडीया आणि सुनिल रामसिंग तापडीया यांचे घरावर रेड करुन घराची घरझडती घेतली असता. त्यांचे घरात व त्यांचे ताब्यात असलेला गुटखा जप्त केला. यामध्ये प्रतिबंधीत गुटखा पानमसाला मिळून आला जाफराणी जर्दा, मस्तानी चाऊमिंग तंबाखू, बाजीराव गोल्ड पान मसाला, नजर प्रिमियर, बाजीराव गोल्ड पान मसाला, नजर, तंबाखू, वाह पान मसाला, विमल पान मसाल, गोवा पान मसाला इ. एकुण 4,11,639/-रुपये चा प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला मिळुन आला.

सदर प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला व सदर मालाची वाहतुक करण्यासाठी वापरलेली मालवाहतूक चारचाकी वाहन महिन्द्रा सुप्रो किंमत 4,50,000/-रुपये, आरोपीने वापरलेला रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत 8,000/- असा एकूण 8,69,639/-रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Written By: Dhanshri Shintre.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT