Latur Shyamnagar MIDC Mother Killed 1 years Daughter  Saam Tv
क्राईम

Shocking : लातूर हादरलं! नवऱ्याचा राग लेकीवर, संतापलेल्या आईने दीड वर्षाच्या मुलीवर चाकूने केले वार, जागेवर मृत्यू

Latur Crime News : लातूरमध्ये पती उशिरा घरी आल्याच्या रागातून आईने दीड वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मातेला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • लातूरमध्ये दीड वर्षांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

  • घरगुती वादातून संताप अनावर झाल्याचा आरोप

  • एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी अटक

  • घटनेनंतर परिसरात तीव्र खळबळ

Latur Shyamnagar MIDC Mother Killed 1 years Daughter लातूरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पतीला कामावरून येण्यासाठी उशीर झाल्याने संतापलेल्या जन्मदात्रीने पोटच्या दीड वर्षीय मुलीची चाकूने वार करत हत्या केली असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. सदर घटना लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील श्याम नगर भागात घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून रागावर नियंत्रण नसेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे वडील विक्रम जगन्नाथ चौगुले (वर्षे ३४) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी म्हणजेच १९ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास विक्रम हे कामाला गेले असता त्यांना घरी परतण्यासाठी काहीसा उशीर झाला. याच कारणावरून त्यांची पत्नी अश्विनी विक्रम चौगुले (वर्षे ३०) हिचा संताप अनावर झाला.

रागाने संतापलेल्या अश्विनीने घरातील धारदार चाकू आणला अन् आपल्या दीड वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्यंत क्रूरपणने सपासप वार केले. आरोपी मातेने मुलीच्या तोंडावर, पोटावर, छातीवर, कमरेवर, डोक्यात आणि गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले. आई करत असलेल्या क्रूर हल्ल्यात तो इवलुसा जीव विव्हळत होता. मात्र त्या वैरीण आईला तिची जरा देखील दया आली नाही.

या भीषण हल्ल्यात पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. विक्रम हे घरी येताच त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि पत्नीच्या क्रूरतेचा पाढा वाचत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अश्विनी हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात शिवीगाळ; प्राजक्ता-अनुश्रीमध्ये टोकाचे भांडण, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीची सत्ता स्थापन केली जाईल- श्रीकांत शिंदे

Tawa Pulav Recipe: घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल व्हेज तवा पुलाव; मुलं आवडीने खातील

Baba Vanga Gold Prediction: सोनं होणार आणखी महाग? बाबा वेंगांचे भाकित खरं ठरणार? जाणून घ्या किंमती

KDMC Mayor: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचा, मनसेने दिला पाठिंबा

SCROLL FOR NEXT