Akola : वाह रे पठ्ठया! अकोल्यात 'रूग्णसेवक' बनला 'नगरसेवक'; वाचा संपूर्ण प्रवास

Akola Nagarsevak Parag Gavai News : २२ वर्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत असलेले पराग गवई अकोला महापालिकेचे नगरसेवक झाले आहेत. हा विजय सेवा, माणुसकी आणि जनतेच्या विश्वासाचा कौल मानला जात आहे.
Akola : वाह रे पठ्ठया! अकोल्यात 'रूग्णसेवक' बनला 'नगरसेवक'; वाचा संपूर्ण प्रवास
Akola Nagarsevak Parag Gavai NewsSaam Tv
Published On
Summary
  • रुग्णसेवक पराग गवई अकोला महापालिकेचे नगरसेवक

  • २२ वर्षांची रुग्णसेवा आणि सामाजिक कार्याचा जनतेकडून गौरव

  • ४२७२ मतांच्या फरकाने दणदणीत विजय

  • सेवा, माणुसकी आणि विश्वासाला मिळालेली पोचपावती

अक्षय गवळी, अकोला

देशासह राज्यात अलिकडे राजकारण म्हणजे फक्त सत्ता आणि पैशांचा खेळ असल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळतं आहे. मात्र, राजकारणाची खरी ओळख ही सेवा, माणुसकी आणि विश्वासाची आहे. राजकारणाच्या याच मुलतत्वांना अधोरेखित करणारा एक निकाल अकोलेकरांनी लावला आहे. अकोला महापालिकेतीलं प्रभाग क्रमांक १४ मध्ये हा निकाल अकोलेकरांनी लावला. २४ तास रुग्णांसाठी धावून जाणारा अन ‘रुग्णसेवक’ म्हणून ओळखला जाणारा पराग गवई आता अकोला महापालिकेचा नगरसेवक झाला आहे. इतकेच नव्हे तर परागने अख्ख पॅनलचं निवडून आणलं आहे. तर पाहुयात अकोल्यातल्या या एका समर्पित रूग्णसेवकाचा 'नगरसेवकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास.

अकोल्याच्या जिल्हा रूग्णालयात सैरभैर झालेले रूग्ण अन त्यांच्या नातेवाईकांसाठीचं अगदी हक्काचं नाव पुढं येतं आहे, ते म्हणजे पराग गवई याचं. कोणत्याही रूग्णाला ओळख असो की नसो. परागचं या सर्वांसोबत संवेदनेच्या धाग्यानं नातं जोडलं गेलं आहे. अकोल्याच्या शासकीय रूग्णालयात रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध असणारा रूग्णसेवक अशी पराग गवईची ओळख आहे. आपली खासगी नोकरी करीत परागची गेल्या २२ वर्षांपासून ही सेवा यज्ञ सुरू आहे. मात्र, 'रूग्णसेवक' असलेल्या परागच्या नावापुढे आता आणखी एक वेगळी ओळख लागली आहे. पराग आता नगरसेवक झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मधील खुल्या गटातून परागने निडवणूक लढवली. आणि तब्बल ४२७२ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्याने भाजप उमेदवार गोपाल मुळेसह ज्येष्ठ सहकार नेते जगदीश पाटील मुरूमकार दणदणीत पराभव करून विजय खेचून आणला आहे. .

Akola : वाह रे पठ्ठया! अकोल्यात 'रूग्णसेवक' बनला 'नगरसेवक'; वाचा संपूर्ण प्रवास
Mumbai News : मुंबईत धावत्या बसने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली, पहा VIDEO

विशेष सांगायला गेलो तर पराग गवई यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण ४ सदस्यीय पॅनलही विजयी झालं आहे. त्यामुळे हा विजय केवळ राजकीय नाही, तर जनतेच्या विश्वासाचा कौल मानला जात आहे. उज्वला प्रवीण तायडे, जयश्री बहाद्दूरकर, शेख शमसु शेख कमर शेखं साबीर आणि पराग गवई असे चारही विजयी सदस्यांची नावे आहे.

Akola : वाह रे पठ्ठया! अकोल्यात 'रूग्णसेवक' बनला 'नगरसेवक'; वाचा संपूर्ण प्रवास
Akola : अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स, कोणत्या पक्षाचा महापौर होणार?

परागने पस्तीशीतील आतापर्यंत ४७ वेळा रक्तदान केलं आहे. तसंच, त्यांनी आजवर ९०० हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून माणुसकीचं आदर्श घडवून दिलं आहे. करोनाच्या जीवघेण्या काळातही परागने ४० मृतदेहांवर अंतिम संस्कार केलेले आहेत, पोलिसही बेवारस मृतदेह मिळाल्यावर थेट पराग गवईशी संपर्क करतात. त्याच्या या माणुसपणामुळे सर्वत्रच चर्चा आणि कौतूक होत असायचं. दरम्यान, शेकडो रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी १५ हजारांपेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या अकोल्यातील रक्तपेढ्यांना उपलब्ध करून दिल्या. म्हणूनच, पराग गवई यांचा हा विजय केवळ निवडणुकीचा निकाल नाही. तर ही सेवा, माणुसकी आणि विश्वासाला मिळालेली पोचपावती असल्याची भावना अकोल्यात व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com