Latur Sex Racket Busted | Police Rescue 21-year-old Woman, Two Arrested saam tv
क्राईम

1 फ्लॅट, 3 पुरूष आणि 1 तरुणी; लातूरमध्ये वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, पोलिसांनी असा रचला सापळा

Latur Police Busted Prostitution Racket : लातूर पोलिसांनी एका गुप्त मोहिमेद्वारे 'माउली नगर' येथील कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केलाय. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. २१ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे.

Bharat Jadhav

  • लातूरच्या माऊली नगरमध्ये सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

  • लातूरमध्ये पोलिसांनी ग्राहक बनून देहव्यापाराचा प्रकार उघड केला

  • देहव्यापार प्रकरणात २१ वर्षीय तरुणीची पोलिसांकडून सुटका

लातूर शहरात चालणाऱ्या देहव्यापार रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून २१ वर्षीय तरुणीची सुटका केली आहे. पोलिसांच्या मते या तरुणीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले होते. या प्रकरणातील एक संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आलाय.

ही कारवाई लातूरमधील माऊली नगर भागात करण्यात आली. या परिसरातील एका फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. केवळ मिळालेल्या माहितीच्या आधारे थेट छापा न टाकता, पोलिसांनी आधी त्या माहितीची खातरजमा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पोलिसांनी साफळा रचला आणि ग्राहक म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना तेथे पाठवलं. त्यावेळी खरोखरच वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचं आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्या फ्लॅटवर छापा टाकला.

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळावरून दोन व्यक्तींना अटक करण्यात आलीय. त्यांची ओळख जावेद युसूफ सय्यद आणि जयश्री राम तारोटे अशी पटलीय. दरम्यान,आणखी एक व्यक्ती पोलिसांच्या तावडीतून निसटून पळून जाण्यात यशस्वी झाली. या छाप्यात पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणीचीही सुटका केलीय. ही तरुणी नागपूरची रहिवासी आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान तिने सांगितले की, तिला वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले जात होतं.

तरुणीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांकडून मिळालेले पैसे दोन आरोपी आणि इतर काही व्यक्तींमध्ये वाटून घेतले जात होते. या कथित रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहे आणि त्याचे जाळे किती पसरलेले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत कारवाई सुरू केलीय. दोन संशयितांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Cut : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! मंगळवारी नळाला पाणी येणार नाही, कोणते भाग प्रभावित?

यालाच देशद्रोही... ज्ञानेश कुमार यांना जेलमध्ये पाठवणार; राहुल गांधी रामलीला मैदानातून गरजले|VIDEO

WhatsApp वापरणाऱ्यांच्या कामाची बातमी, ग्रुप ॲडमिनला मिळणार 4 खास फीचर्स, नेमका फायदा काय?

Maharashtra News Live Update: मतचोरीच्या आरोपावरून मुंबईत विरोधक आक्रमक! CSMT बाहेर आंदोलन

1 Gram Gold For Dhanteras: धनतेरसला 1 ग्रॅम सोन्यामध्ये खरेदी करा 6 वस्तू

SCROLL FOR NEXT