Latur Crime News Saam Tv
क्राईम

Latur Crime News: धक्कादायक! पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेचा अपमान; त्रासाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Woman End Life Who Went To File Complaint At Police Station: लातूरमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेने आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या अपमानजक वागणुकीला कंटाळून या महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

संदिप भोसले, साम टीव्ही लातूर

पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेने आत्महत्या केल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. या महिलेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेनं असं टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांच्या अपमानजनक वागणुकीला त्रासल्याने महिलेने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, ही महिला लातूर जिल्ह्यातील वैशालीनगर भागात राहत होती. तिच्यासोबत छेडछाडीची घटना घडली (Latur Crime News) होती. त्यामुळे पिडित महिलेने पोलिसांत धाव घेतली होती. ती लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. परंतु पोलीस ठाण्यातच तिला अपमानास्पद वागणूक मिळाली. पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेचा अपमान झाला.

मात्र, तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेस पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या महिलेला अपमानजनक वागणूक (Woman End Life) दिली. त्यामुळे पोलिसांच्या आणि छेडछाड करणाऱ्या आरोपीच्या त्रासाला कंटाळून या महिलेने विहिरीत उडी घेतली. तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे लातूरच्या वैशालीनगर भागात मोठी खळबळ उडाली (Crime News) आहे.

दरम्यान मृत महिलेच्या नातेवाईकांच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केली आहे. या घटनेमुळे (Latur News) लातूरमध्ये नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. खरं तर मदतीच्या हेतुने सर्वसामान्य पोलिसांकडे धाव घेतात. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनीच पीडित महिलेला अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे मृत महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याचं लातूरमध्ये समोर आलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT