kopargoan police arrests five saam tv
क्राईम

Nagar Crime News : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड; 10 लाख 83 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

या टाेळीतील आणखी दाेघांचा काेपरगाव पाेलिस शाेध घेताहेत. या टाेळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Nagar News :

कोपरगाव तालुक्यातील देर्डे- को-हाळे शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत गजाआड केले. त्यातील एक जण मोक्काच्या गुन्ह्यात फरार होता. पाेलिसांनी संशयितांकडून दहा लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मयुर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड (वय 21, रा. इंदिरानगर, ता. कोपरगांव), अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे (वय 20, रा. एकरुखे, ता. राहाता), समाधान देविदास राठोड (वय 23, रा. करंजीबोलकी, ता. कोपरगांव), संदीप पुंजा बनकर (वय 33, रा. द्वारकानगर रोड, शिर्डी, ता. राहाता), उमेश तानाजी वायदंडे (वय 27, रा. गणेशनगर, ता. राहाता) अशी अटक केलेल्यांचे नाव असल्याचे सांगितले. याव्यतरिक्त अन्य दाेघांचा पाेलिस शाेध घेताहेत.

या गुन्हेगारांकडून तलवार, कटवणी, गुप्ती, लाकडी दांडके, मिरची पुड्या असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी आरोपींकडून चार मोबाईल, दोन कार असा दहा लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

नवीन व्यवसाय सुरू कराल, भाऊबीजेला नातेबंध आणखी पक्के होईल; ५ राशींच्या लोकांसाठी स्मरणात राहणारा दिवस ठरणार

SCROLL FOR NEXT