Online gaming addiction Saam Tv
क्राईम

Crime News: ऑनलाईन गेमिंगच्या नादात आयुष्य उद्ध्वस्त, गळफास घेत संपवलं आयुष्य; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

Online gaming addiction: कोल्हापूरमध्ये ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे तरुणांमधील वाढत्या गेमिंग व्यसनाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कोल्हापूरच्या कोरोची ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदित्य मिलिंद कोळी असं या तरुणाचं नाव आहे. हा २४ वर्षीय आदित्यने गेममध्ये पैसे गमावल्याच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य कोळी हा कोरोचीच्या एस.टी. स्टँड परिसरात त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. शनिवारी सायंकाळच्या सुमारास घरातील सदस्य त्यांच्या कामात व्यस्त असताना आदित्य वरच्या मजल्यावर गेला. काही वेळानंतर तो दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता त्याने गळफास घेतल्याचं आढळून आलं. ही घटना समोर येताच घरात एकच गोंधळ उडाला.

घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात आत्महत्येपूर्वी आदित्यने एक सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे समोर आलंय. या पत्रात त्याने ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्यामुळे तो नैराश्यात असल्याचं नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आदित्यच्या कुटुंबावर आधीच संकट कोसळलं होतं. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे घराची जबाबदारी आदित्यवरच होती. अशा परिस्थितीत आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी हळहळ व्यक्त केलीये. अनेकांनी ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या व्यसनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तरुणांमध्ये वाढत चाललेलं हे व्यसन गंभीर ठरत असल्याचंही काहींनी सांगितलंय.

शहापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून, सुसाईड नोट आणि इतर बाबींच्या आधारे अधिक माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT