kolhapur police arrest youth along with 11 bike worth rs 5 lakh 30 thousand Saam Digital
क्राईम

कोल्हापुरात युवकास अटक, 5 लाख 30 हजार रुपयांच्या 11 दुचाकी जप्त

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातून एका आंतरराज्य मोटरसायकल चोरट्याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रमेश रवींद्र माने असे संशयित आराेपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 5 लाख 30 हजार रुपये किमतीच्या 11 मोटरसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

कोल्हापूर शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेण्याची सूचना सर्व प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने तपास करताना शाहूपुरी पोलिसांना एक आंतरराज्य मोटरसायकल चोरटा मार्केट यार्ड परिसरात चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

पाेलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मार्केट यार्ड परिसरातून आंतरराज्य मोटरसायकल चोरटयाला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर म्हणाले संशयित आराेपीचे नाव रमेश रवींद्र माने असे आहे. तो निपाणी तालुक्यातील पडलीहाळ येथील रहिवासी आहे.

त्याच्याकडून विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे 5 लाख 30 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे, संदीप जाधव, मिलिंद बांगर,महेश पाटील, शुभम संकपाळ, संदीप बेंद्रे, बाबा ढाकणे, रवी आंबेकर, लखन पाटील सत्याजीत भाट, विकास चौगले यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT