Kolhapur Latest News Saamtv
क्राईम

Kolhapur Breaking News: खळबळजनक! आंबा घाटात आढळले २ तरुणांचे मृतदेह; अपघात की घातपात? पोलिसांकडून तपास सुरु

Kolhapur Latest News: दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम सुरू असून मुसळधार पाऊस, दाट धुके तसेच दरी खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यास अडथळा निर्माण होत आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, ता. १८ ऑगस्ट २०२४

कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाटात दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून या दोघांचा मृत्यू कशामुळे झाला? हा अपघात, घातपात की आत्महत्या? याबाबतचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाटामध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच देवरुख व शाहूवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

मृत तरुणांपैकी एक जण सांगलीमधील तर दुसरा निपाणीचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम सुरू असून मुसळधार पाऊस, दाट धुके तसेच दरी खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यास अडथळा निर्माण होत आहे.

दरम्यान, या तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? यामध्ये काही घातपाताचा कट आहे का? असे अनेक सवाल आता उपस्थित आहेत. मृतदेह बाहेर काढल्यानंतर याबाबत पोलीस तपास सुरू होणार असून त्यामध्ये सर्व प्रकार समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT