Kolhapur News : आईचा अचानक मृत्यू; बहीण-भावाने स्वत:लाही संपवलं, कोल्हापुरातील घटना

Kolhapur Shocking News : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या निधनानंतर कोल्हापुरातील एका बहीण-भावाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
 आईचा अचानक मृत्यू; बहीण-भावाने स्वत:लाही संपवलं, कोल्हापुरातील घटना
Kolhapur News Saam tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापुरातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कोल्हापुरात आईच्या निधनानंतर सख्ख्या बहीण भावाने तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. दोन्ही बहीण-भावांचे मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास कोल्हापूर पोलिसांनी सुरु केला आहे.

आईच्या निधनानंतर मानसिक धक्का बसलेल्या सख्ख्या बहीण भावाने कोल्हापुरातील राजाराम तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. शुक्रवारी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काहींना आढळला होता. 61 वर्षीय भूषण निळकंठ कुलकर्णी आणि 57 वर्षीय वकील भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही अविवाहित होते.

 आईचा अचानक मृत्यू; बहीण-भावाने स्वत:लाही संपवलं, कोल्हापुरातील घटना
Kolhapur Crime News : कोल्हापुरातील उद्योजकाच्या घरात रात्री घडला थरार; अख्ख कुटुंब दहशतीत

आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून आईचा विरह सहन न झाल्याचे कारण समोर आले आहे. या दोन्ही उच्चशिक्षितांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कुलकर्णी बहीण-भावाने नागपूर, सोलापूर, मुंबई, पुणे इथल्या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था, पाळणाघर बांधकामासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे. आत्महत्यापूर्वीच आईच्या नावाने संपत्ती दान केल्याचं पोलिस तापासात उघड झाले आहे.

 आईचा अचानक मृत्यू; बहीण-भावाने स्वत:लाही संपवलं, कोल्हापुरातील घटना
Kolhapur Politics: कोल्हापूरचं राजकारण तापलं! भरसभेत संभाजीराजेंनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना झापलं

अटल सेतू उड्डाणपुलावरून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

अटल सेतू उड्डाणपुलावरून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला वाचविण्यात यश आलं आहे. नाव्हाशेव्हा वाहतूक पोलीसांनी ५६ वर्षीय महिलेचे प्राण वाचविले आहे. मुलुंड येथे राहणारी महिला संध्याकाळी ७ च्या दरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईवरून नवी मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर ही घटना घडली. वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश सोनवणे, मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com