Kolhapur Politics: कोल्हापूरचं राजकारण तापलं! भरसभेत संभाजीराजेंनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना झापलं

Kolhapur Politics: संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह संदर्भात कोल्हापूरकरांच्या तीव्र भावना आहेत. तसेच ते शाहू महाराज यांनी उभारलेलं जुनं पॅलेस थिएटर आहे. त्यामुळे यामध्ये कोणतेही राजकारण न आणता लोकसहभागातून हे नाट्यगृह पुन्हा उभारण्यात येईल असं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले.
Kolhapur Politics: कोल्हापूरचं राजकारण तापलं! भरसभेत संभाजीराजेंनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना झापलं
Kolhapur Politics
Published On

रणजीत माजगावकर , साम प्रतिनिधी

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आज खासदार शाहू छत्रपती यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीमध्ये माजी खासदार संभाजी राजे लेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे हातवारे करत या पुनर्बांधणीमध्ये कमिशनचा घोळ झाल्यास सर्वात आधी मी तुमच्या अंगावर येईल, अशा शब्दात दम भरला.

ही बैठक शाहू छत्रपती यांनी बोलावले असली तरीही कामात कोणताही गैरप्रकार झाल्यास मी यासाठी तुम्हालाच जबाबदार धरणार असे संभाजीराजे यांनी हसन मुश्रीफ यांना सुनावलं. संभाजीराजे छत्रपती यांचा अचानक झालेला हा रुद्रावतार पाहून उपस्थित सर्वच अवाक झालेत. हसन मुश्रीफ यांनी मात्र या सगळ्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहणं पसंत केलं.

काही दिवसापूर्वीच विशाळगडमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संभाजी राजे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना संभाजी राजे यांनी देखील हसन मुश्रीफ यांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये, अशा शब्दात मुश्रीफांना फटकारलं होतं. विशाळगड प्रकरणानंतर आता केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीच्या निमित्ताने देखील संभाजी राजे आणि हसन मुश्रीफ वाद वाढत असल्याच्या चर्चा या निमित्ताने कोल्हापुरात रंगल्या..

दरम्यान कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये संपूर्ण नाट्यगृह जळून भस्मसात झाले आहे. नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्यासाठी आज कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पूर्वीप्रमाणेच संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभारले जावं अशी मागणी करण्यात आली.

कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झालेले आहेत. राज्य शासनाने 20 कोटी रुपये जाहीर केले असून हे नाट्यगृह उभारणीसाठी आता कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते एकत्र आलेले आहेत. आज कोल्हापुरातील सर्किट हाऊस इथं कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी संदर्भात विचार विनिमय करण्यात आले.

Kolhapur Politics: कोल्हापूरचं राजकारण तापलं! भरसभेत संभाजीराजेंनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना झापलं
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश; नेमकं काय आहे प्रकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com