Kerala Police News Saam Tv
क्राईम

Operation Cy-Hunt : 'ऑपरेशन साय-हंट'! एकाच दिवशी २६३ गुन्हेगारांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

Kerala Police News : केरळ पोलिसांनी “ऑपरेशन साय-हंट” अंतर्गत राज्यभरात सायबर गुन्ह्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या मोहिमेत २६३ आरोपींना अटक करण्यात आली असून ३८२ गुन्हे दाखल झाले आहेत.

Alisha Khedekar

केरळ पोलिसांनी “ऑपरेशन साय-हंट” अंतर्गत सायबर गुन्ह्यांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली

२६३ आरोपींना अटक आणि ३८२ गुन्हे दाखल करण्यात आले

ऑनलाइन ट्रेडिंग, नोकरीचे आमिष आणि गुंतवणूक फसवणुकीवर पोलिसांची मोठी कारवाई

एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी सायबर गुन्हेविरोधी मोहीम ठरली

दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीचा विळखा वाढत आहे. ऑनलाईन लुटारूंची दहशत नागरिकांना हैराण करत आहेत. अशातच केरळ पोलिसांनी मोहीम हाती घेत मोठी कारवाई पार पाडली आहे. "ऑपरेशन साय-हंट" नावाच्या या मोहिमेत २६३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि १२५ संशयितांवर देखरेख ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, राज्यभरात ३८२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळ पोलिसांनी राज्यभरात सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांविरुद्ध "ऑपरेशन साय-हंट" नावाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवारी सकाळी ६ वाजता ही कारवाई सुरु केली. या कारवाईदरम्यान राज्यभरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या परिसरात एकाच वेळी छापे टाकण्यात आले. एडीजीपी एस. श्रीजीत यांच्या देखरेखीखाली आणि रेंज डीआयजी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांच्या देखरेखीखाली कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ऑनलाइन ट्रेडिंग फसवणूक, सोशल मीडिया जाहिरातींमध्ये फसवणूक, बनावट कर्ज आणि गुंतवणूक घोटाळे आणि ऑनलाइन नोकरीत फसवणूक अशा प्रकारच्या गुन्हेगारी अंतर्गत पोलिसांनी तब्बल २६३ व्यक्तींना अटक केली. तसेच राज्यभरात ३८२ गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिसांना तपासा दरम्यान मिळलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले की २,६८३ आरोपींनी चेक वापरून पैसे काढले होते, ३६१ जणांनी एटीएममधून पैसे काढले होते आणि ६६५ जणांनी बँक खात्यातून फसवणूक करून नागरिकांना लुटले. पोलिसांनी मोठी कारवाई करत या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एका दिवसात सायबर गुन्ह्यांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

SCROLL FOR NEXT