Crime News Yandex
क्राईम

Shocking News: तिकीट विचारलं म्हणून संतापला; प्रवाशाने धावत्या ट्रेनमधून फेकल्यामुळे टीसीचा मृत्यू

Passenger Pushed TC To Death: पाटणा एक्स्प्रेसमध्ये तिकीट नसल्यामुळे एका प्रवाशाने टीसीला धक्का दिला. या घटनेत टीसीची मृत्यू झाला आहे.

Rohini Gudaghe

Kerala Crime News

पाटणा सुपरफास्ट ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पाटणा एक्स्प्रेसमध्ये काल (२ एप्रिल) तिकीट नसल्यामुळे एका प्रवाशाने टीसीला धक्का दिला. या घटनेत टीसीची (Kerala Crime News) मृत्यू झाला आहे. ही घटना संध्याकाळी सात वाजता घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. धावत्या ट्रेनमधून खाली पडल्यामुळे टीसीचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Crime News)

ही घटना मंगळवारी केरळमधील मुलंगुन्नाथुकावू आणि वडक्कनचेरी रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. एर्नाकुलम-पाटणा एक्स्प्रेसच्या एस 11 कोचमध्ये टीसी (TC) तिकीट तपासात होता. तेव्हा त्याने एका प्रवाशाकडे तिकीट (Crime News) मागितले. परंतु, या प्रवाशाचा टीसीसोबत वाद झाला त्याने टीसीला धावत्या ट्रेनमधून खाली धकलले. यामध्ये टीसीचा मृत्यू झाला आहे. या प्रवाशाकडे तिकीट (Ticket) नसल्याचं समोर आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेमध्ये टीसीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती केरळ रेल्वे पोलिसांनी दिली आहे. ई के विनोद असं मृत्यू झालेल्या टीसीचं नाव आहे. प्रवाशाने टीसीला धक्का का दिला, नेमकं त्यांच्यामध्ये काय घडलं होतं? याचा शोध रेल्वे पोलीस घेत (Passenger Pushed TC To Death) आहेत. परंतु प्राथमिक तपासामध्ये आरोपी हा ओडिशातील स्थलांतरित मजूर आहे. ही घटना घडली, तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे.

अलीकडेच, ट्रेनच्या स्लीपर कोचमधील गर्दीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. व्हिडिओंमध्ये असं दिसून आलं आहे की, स्लीपर कोचमध्ये अत्यंत गर्दी (crime) आहे. प्रवाशांना शौचालयासारख्या अत्यावश्यक सेवांचा वापर करणं देखील कठीण होत आहे. अनेक प्रवासी रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करताना अनेकदा दिसतात.

अनेकदा रेल्वेमध्ये जागेवरून प्रवाशांमध्ये भांडणं झाल्याचे व्हिडिओ समोर येत (Train) असतात. त्यामुळे नेहमीच रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. परंतु, आता ही घटना समोर आल्यामुळे आता रेल्वेमध्ये प्रवास करण्यास प्रवाशांमध्ये काहीशी धाकधुक निर्माण झाली (shocking) आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PhonePe Alert: PhonePe युजर्सला झटका! व्यवहार न करताही पैसे कापले जाणार, नवा नियम काय?

Sangli Crime News: कॅफेत बोलावलं अन्...; सांगलीत अल्पवयीन तरुणीसोबत घडलं क्रूर कृत्य

सर्वात स्वस्त साड्या कुठे मिळतात? महिलांना माहितीये का 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत ९ उमेदवारांना दिलासा

धावती लोकल पकडताना 70 वर्षीय व्यक्तीचा तोल गेला, तितक्याच...; डोंबिवली स्टेशनवरील जीवघेणा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT