Kerala Crime Saam tv
क्राईम

Crime: भयंकर! अंघोळ करणाऱ्या बायकोवर चाकूने सपासप वार, जीव घेतल्यानंतर तरुणाने फेसबुकवर लाईव्ह केलं अन्...

Kerala Crime: केरळमध्ये नवऱ्याने बायकोला भयंकर मृत्यू दिला. चाकूने वार करत त्याने बायकोची हत्या केली. महिला अंघोळ करत असताना त्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे केरळमध्ये खळबळ उडाली.

Priya More

केरळमध्ये भयंकर घटना घडली. नवऱ्याने बायकोची चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. बायकोची हत्या केल्यानंतर तरुणाने फेसबुकवर लाईव्ह करत आपणच बायकोची हत्या केल्याची कबुली दिली. केरळच्या कोल्लममध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे केरळमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या हत्याकांडाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या महिलेचे नाव शालिनी (३९ वर्षे) होते. ती नवरा इसहाक याच्यासोबत पुनालुर परिसरातील कूटनदी येथे राहत होते. सोमवारी शालिनीची तिच्या नवऱ्याने चाकूने वार करत हत्या केली. शालिनीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात गेला आणि त्याने आत्मसमर्पण केले. पोलिस ठाण्यात येण्यापूर्वी त्याने फेसबुकवर लाईव्ह करत आपला गुन्हा कबूल केला होता.

आरोपीने शालिनीवर हल्ला केला तेव्हा ती अंघोळ करत होती. पोलिसांनी सांगितले की, ही घटना सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. शालिनी अंघोळीसाठी घरातील स्वयंपाक घरामधील बाथरूममध्ये होती. आरोपी त्या ठिकाणी पोहचला आणि त्याने तिच्यावर हल्ला केला. शालिनीच्या गळ्यावर, छातीवर आणि पाठीवर त्याने चाकूने हल्ला केला. गंभीर जखमा होऊन आणि अधिक रक्तस्राव झाल्यामुळे शालिनीचा जागीच मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर आरोपीने फेसबुकवर लाईव्ह केले आणि आपली ओळख इसहाक असल्याचे सांगितले. फेसबुकवर लाईव्ह आल्यानंतर त्याने बायकोची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने बायकोवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हत्येनंतर तो पोलिस ठाण्यात हजर झाला आणि आत्मसमर्पण केले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शालिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शालिनीला १९ वर्षीय मुलगा आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गु्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याचा आणि हत्या झालेल्या शालिनीचा मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक टीम घेऊन गेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Afghanistan ODI: रोहितचा रेकॉर्ड, विराटच्या जागी कोणाला संधी? वाचा अफगाणिस्ताविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11

Maharashtra News Live Update : पुण्यात एल निनोचा मॉन्सूनवर प्रभाव, सरासरी पेक्षा ९० टक्के इतकाच पाऊस पडेल

दरमहा 2250 रुपये मिळणार! 'या' सरकारी योजनेसाठी कोण पात्र? जाणून घ्या

Mumbai water crisis : मुंबईकरांची चिंता वाढली! वैतरणा धरण कोरडे, ७ धरणांमध्ये केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक

वायुसेनेचे विमान क्रॅश! लँडिंगनंतर विमानाला लागली भीषण आग; बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT