क्राईम

Karnataka Crime: विवाहित महिला कॅब ड्रायव्हरच्या प्रेमात पडली; नवऱ्याला सोडून पळून गेली, त्यानंतर भयंकर घडलं

Man kills Wife And Her Lover: आजकाल कोण, कधी कुणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Karnataka Crime News

विवाहित महिला कॅब ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती नवऱ्याला सोडून कॅब ड्रायव्हरसोबत पळून गेली. परंतु त्यानंतर अतिशय भयंकर घडलं आहे. तिच्या नवऱ्याने तिला आणि तिच्या प्रियकराचा खून केल्याची माहिती मिळतेय. (Latest Crime News)

कर्नाटकातील (Karnataka) बेळगावी जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे. 19 वर्षीय हिना मेहबूब आणि तिचा प्रियकर यासिन आदम (21 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तौफीक शौकत (२४) असं आरोपीचं नाव आहे. तो कोकटनूर गावचा रहिवासी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली

हिना आणि तौफिक यांचं चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांनी दर्ग्यात जाण्यासाठी कॅब भाड्याने घेतली होती. मात्र, हिना कॅब ड्रायव्हर यासिनच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती पतीला सोडून कॅब ड्रायव्हर यासिनसोबत पळून गेली. त्यानंतर हिना आणि तिचा प्रियकर यासीन कोकटनूर येथील फार्महाऊसमध्ये राहू लागले.

तौफिकला हिनाच्या या कृत्याचा राग आला. राग अनावर झाल्यामुळे तौफिकने मंगळवारी सायंकाळी त्यांच्या घरी जाऊन धारदार शस्त्राने वार (Crime News) केले. यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झालाय.

आरोपीचा शोध सुरू

तौफिकने पत्नी हिनाचा शिरच्छेद (Man kills Wife) केला आणि नंतर यासिनची हत्या केली. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या हिनाच्या आई-वडिलांवरही तौफिकने हल्ला केला. जखमींवर राज्यातील मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू ( Crime) आहेत. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

या घटनेमुळं चांगलंच दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swastik Importance: दारावर स्वस्तिक का काढतात?

Maharashtra Live News Update : नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आक्रमक

शरद पवार गटाला जोरदार धक्का; माजी आमदाराचा २,२७५ कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश

Bail Pola : सातपुड्यात आहे बैलांचे ब्युटी पार्लर; पोळ्यासाठी महिला तयार करतात खास बैलांचा शृंगार

Raigad: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, अनेक जण अडकल्याची भीती, थरारक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT