Kanpur domestic violence saam tv
क्राईम

Crime News: केसांना धरून रस्त्यावर फरफटत आणलं, कपडे फाडले; निर्दयी सासऱ्याची सूनेला बेदम मारहाण, धक्कादायक व्हिडिओ

Kanpur domestic violence: कानपूरमध्ये सासऱ्याने सुनेवर केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हुंड्याच्या मागणीवरून छळ केल्याचा आरोप पीडितेने केला असून पोलिसांनी एफआयआर नोंदवत एका आरोपीला अटक केली आहे आणि तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केलाय. सासऱ्यानेच त्याच्या सुनेला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील आनंद नगर परिसरात ही घटना घडलीये. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला मदतीसाठी ओरडतेय. मला वाचवा…हे मला मारून टाकतील, असा तिचा ओरडण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही प्रयागराजची रहिवासी असून तिचं लग्न 2020 साली कानपूरमधील हिमांशू दुबे याच्यासोबत झालं होतं. हिमांशू एका शू कंपनीत आयटी मॅनेजर म्हणून काम करतो. तर त्याचे वडील सुशील दुबे हे रेल्वे खात्यातून क्लर्क पदावरून निवृत्त झालेत.

महिलेचे सासरच्यांवर गंभीर आरोप

महिलेने गंभीर आरोप करताना सांगितलं की, लग्नाच्या सुरुवातीपासूनच सासरकडील मंडळींकडून तिच्यावर मोठ्या प्रमाणात हुंड्याची मागणी करत होते. काही एक जमीन आणि 20 लाख रुपये रोख अशी मागणी करण्यात आली होती. या मागण्या पूर्ण करण्यास तिने नकार दिल्यावर तिला सतत मारहाण, अपमान आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचे सासरे सुशील दुबे, सासू रमा, दीर अभिषेक आणि वहिनी श्रुती यांनी मिळून तिला त्रास दिला. काही दिवसांपूर्वी ती आपल्या माहेरी गेली होती. शुक्रवारी दुपारी सुमारे दोन वाजता ती तिचा ऋषिकेश पांडे आणि वहिनी प्रीती पांडे यांच्यासोबत पुन्हा सासरी परतली.

कपडे फाटेपर्यंत केली मारहाण

महिलेने सांगितले की, घराचा दरवाजा ठोठावून आत गेल्यानंतरच सुशील दुबे संतापले. त्यांनी शिवीगाळ करत कोणतीही कारण नसताना तिला मारहणार केली. तिला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नव्हे, तर तिचे कपडे फाडून तिच्या प्रायव्हेट पार्ट्सवरही मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे.

दरम्यान, शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं पीडितेने सांगितले. तसंच तिचे केस पकडून तिला घरातून ओढत रस्त्यावर आणण्यात आलं. या सगळ्या प्रकारात ती सतत 'मला वाचवा' अशी आरडाओरड करत होती.

या घटनेवेळी तिची पाच वर्षांची मुलगीही घरात उपस्थित होती आणि तिने हा सगळा प्रकार पाहिला. पीडित महिलेने असा आरोपही केला की, तिच्या सासरच्यांकडून तिच्या जीवाला धोका निर्माण आहे आणि तिच्या हत्या करण्याचा कट रचला जात होता. तिला घरात डांबून ठेवण्यात आलं होतं आणि मारहाणीत तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या, तरी तिला डॉक्टरांकडे नेलं नाही.

महिलेची पोलिसांमध्ये धाव

महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती मात्र सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. नंतर या प्रकरणाची माहिती मिळताच एसीपी चकेरी अभिषेक कुमार पांडे यांनी हस्तक्षेप करत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानंतर एक आरोपीला अटक करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : डेटिंग अ‍ॅपवर तरुणाशी ओळख, बारमध्ये भेटायला बोलावलं; तरुणीने नंतर जे काही केलं ते चक्रावून टाकणारं...

Maharashtra Live News Update: बीडच्या पारगाव शिरस गावात भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार

राज्याला मिळाले नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी

Madhavi Nimkar Photos: 'जणू आकाशातून अप्सराच अवतरली!' माधवीचं मराठमोळं सौंदर्य पाहून हेच म्हणाल

Weather Update : अकोल्यात सूर्य ओकतोय आग, जगातील उष्ण शहरांच्या यादीत दुसरं नाव; आजचं तापमान किती?

SCROLL FOR NEXT