laptop Saam tv
क्राईम

Kalyan Crime : लुटीचा बनाव केला, मित्राचा लॅपटॉप परस्पर विकला; यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीचा अजब कारनामा

young lady resell friend laptop for money : यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीने मित्राचा लॅपटॉप परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तरुणीवर ठोस कारवाई करण्यात येणार आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीने धक्कादायक कारनामा केला आहे. यूपीएससी परिक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुणीकडे पैसे नव्हते. तरुणीला आर्थिक चणचण होती. यामुळे या तरुणीने मित्राकडून लॅपटॉप मागितला. मात्र तिने पैशांची गरज असल्याने लॅपटॉप विकला. मित्राने लॅपटॉप मागितला. त्यानंतर या तरुणीने बनाव रचला. कल्याणमधील तरुणीने स्वत:च्या अंगावर कास्टिक सोडा टाकून लुटीचा बनाव केला. मात्र तिचा बनाव पोलिसांनी उघडा पाडला. पोलीस या तरुणीच्या विरोधात ठोस कारवाई करणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी कोर्टाकडून परवानगी मागितल्याची माहिती मिळत आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण पूर्वेतील प्रभाग कार्यालयासमोर असलेल्या तरुणीवर केमिकल टाकून लॅपटॉप घेऊन चोरटे पसार झाल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांत लुटीचा गुन्हा नोंदवला. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांनी तपास सुरु केला होता. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु झाला. त्यानंतर तक्रारदार तरुणीच्या माहितीवर संशय आला.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी या प्रकारात सखोल चौकशी केली, तेव्हा त्यांना धक्कादायक माहिती समोर आली. ही तरुणी अंधेरी येथे राहते. तरुणी यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. या तरुणीने मित्राकडून लॅपटॉप घेतला. त्यानंतर लॅपटॉप परस्पर विकला. त्यानंतर तिच्याकडे पैसे उरले नव्हते. त्यामुळे तिने बनाव रचला. या तरुणीने कल्याणमध्ये जाऊन एका दुकानातून कास्टिक सोडा घेतला.

तरुणीने ज्या दुकानातून सोडा खरेदी केला, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी तरुणीची अधिक चौकशी केली, त्यानंतर तिने गुन्हा कबुल केला. मित्राला लॅपटॉप परता करता येत नसल्याने बनाव रचल्याचे कबुल केले. आता या प्रकरणात पोलीस खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याने तरुणीच्या विरोधात ठोस कारवाई करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IIT Research Diabetes : मधुमेहिंसाठी आशेचा किरण! किडणी विकाराचे आता लवकर निदान होणार | VIDEO

Comet AI ब्राउझरला धक्का! Amazon ने Perplexity ला फीचर थांबवण्याची दिली नोटीस

विरारचा प्रवास वेगात होणार, निवडणुकीआधी सरकारने घेतला मोठा निर्णय, मुंबईसह पुण्यासाठी महत्त्वाची घोषणा

Shirur: मुलगा खेळत होता झोका, दबक्या पावलाने बिबट्या आला; हल्ल्यात चिमुकला बचावला; थरकाप उडवणारा VIDEO

Ahilyanagar News : पुण्यानंतर आता आहिल्यानगर तापलं, जैन समाजाच्या जागेवरून संग्राम जगतापांना घेरलं, ट्रस्टीकडून खुलासा, वाचा संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT