Kalyan News Saam TV
क्राईम

Kalyan News : सोन्याचे दागिने आणि पैशांनी भरलेली बॅग कल्याण रेल्वे स्थानकात विसरला; पुढे काय घडलं?

Kalyan News : त्यानंतर पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलिसांनी तत्काळ बॅगेच्या मालकाशी संपर्क साधला व त्यांना बॅग, चांदीचे दागिने, 30हजारांची रोकड सुपूर्त करण्यात आली.

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख

Kalyan Railway Station :

आज सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एस्क्लेटरजवळ एक बेवारस बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. स्टेशन परिसरात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सतर्कता दाखवत मोठ्या धाडसने बॅग तपासली असता या बॅगेत नवीन कपडे व चांदीचे दागिने,30 हजार रोकड असलेली पर्स आढळून आली.

त्यानंतर पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलिसांनी तत्काळ बॅगेच्या मालकाशी संपर्क साधला व त्यांना बॅग, चांदीचे दागिने, 30हजारांची रोकड सुपूर्त करण्यात आली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे प्रवाशाला आपली बॅग परत मिळाली. त्यामुळे त्याने वाहतूक पोलिसांचे आभार मानले.

नेमकं काय घडलं?

आज सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडे स्टेशन परिसरात एस्कलेटर शेजारी एक बॅग बेवारस रित्या पडली होती. काही नागरिकांचे लक्ष गेलं त्यांनी याबाबत जवळच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस ट्राफिक ऑर्डर नाही याबाबत माहिती दिली. वाहतूक पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डनने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

बॅगेची झडती घेतली असता बॅगेमध्ये नवीन कपडे,चांदीचे दागिने ते 30 हजार रोकड असल्याचं आढळले. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांनी देखील सुटकेचा विश्वास सोडला. वाहतूक पोलिसांनी या बॅगमलकाचा शोध सुरू केलाय.

बॅगेत असलेल्या कागदपत्रांच्या सहाय्याने वाहतूक पोलिसांनी बॅगमालकाला संपर्क केला. लक्ष्मीदास गुप्ता असे या प्रवाशाचे नाव होते. आज सकाळी पत्नी व मुलांसह तो उत्तर प्रदेश येथून कल्याणला आला होता. रेल्वे स्थानकातून उतरल्यानंतर घरी जाण्याची घाई असल्याने बॅग स्टेशन वर विसरला.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुप्ता यांना आपली बॅग परत मिळाली त्यामुळे त्यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले. वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश शिरसाठ यांनीदेखील ट्राफिक वॉर्डन व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

Satara: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्यांना बसने चिरडलं, एकाचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Shivali Parab Photos : "तुम्हारी अदा भी क्या खूबसूरत है..."; शिवालीला पाहून चाहत्यांची विकेट पडली

Watch: धक्कादायक! खेळताना बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

SCROLL FOR NEXT