Dombivli Crime News saam tv
क्राईम

Dombivli Crime: इको व्हॅन घेऊन आले अन् घरासमोरील स्कॉर्पिओ चोरून पसार झाले; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Dombivli News: इको व्हॅनमध्ये आलेल्या चोरट्यांनी एका बंगल्यासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी चोरून नेल्याची घटना डोंबिवली मिलाप नगर परिसरात घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. २० जानेवारी २०२४

Dombivli Crime News:

इको व्हॅनमध्ये आलेल्या चोरट्यांनी एका बंगल्यासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी चोरून नेल्याची घटना डोंबिवली मिलाप नगर परिसरात घडली. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली मिलापनगर परिसरातील देवप्रभा बंगल्यामध्ये दिनेश राणे आपल्या कुटुंबासह राहतात. गुरुवारी सायंकाळी (१८, जानेवारी) राणे घरी आले व आपली स्कॉर्पिओ गाडी बंगल्यासमोर रोड लगत पार्क केली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी त्यांची स्कॉर्पिओ गाडी चोरून नेली.

सकाळी गाडी चोरीला गेल्याच्या कळताच राणे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे रात्रीच्या सुमारास एका सफेद रंगाच्या इको व्हॅन मध्ये चोर आले त्यांनी स्कॉर्पिओ गाडी चोरून नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई..

दरम्यान, धुळ्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. घरफोडी करणाऱ्या पाच कुख्यात चोरट्यांना जेरबंद करण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून यापूर्वी त्यांनी घरफोडी केलेल्या चांदीच्या भांड्यांसह मोठा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, त्याचबरोबर या चोरट्यांकडून बंदुकीसह ईतर शस्त्र देखील हस्तगत केले आहेत. (Crime News in Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती जवळ आग लागल्याची घटना

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

Firecracker Safety Guide: फटाके फोडताना काळजी घ्या! डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना|VIDEO

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

SCROLL FOR NEXT